सामाजिक बांधिलकी जोपासून महसूल प्रशासन लोकाभिमुख करा- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

0
24

गोंदिया,दि.१ : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच महसूल यंत्रणेकडे शासन विश्वासाने बघते. या यंत्रणेमार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. गरजूंना मदत व योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून महसूल प्रशासन लोकाभिमुख करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
आज १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, गोंदिया उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, देवरी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांची उपस्थिती होती.
डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, शासनाच्या कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. महसूल विभाग हा सोपविलेली कामे पूर्णपणे पार पाडतात हा त्यांचा विश्वास आहे. जनतेच्या आयुष्यात सुख शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करुन लोकांना मदत व त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून अपर जिल्हाधिकारी महसूल दिनापासून चांगले काम करण्याची सुरुवात महसूल विभाग करीत आहे. सर्वात पहिले महसूल विभाग अस्तित्वात आला. या विभागाच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत झाली. समाधान शिबिराच्या माध्यमातून लोकांना योजनांची माहिती देवून योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे असेही सांगितले.
यावेळी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये गोंदिया तहसिलचे नायब तहसिलदार विजय पवार, मंडळ निरिक्षक टी.एस.पोरचेट्टीवार, तलाठी सुनिल राठोड, अव्वल कारकून आशिष रामटेके, लिपीक सोनाली भोयर, शिपाई एल.डी.मोहनकर, कोतवाल राजेंद्र टेंभूर्णे, सालेकसा तहसिलचे नायब तहसिलदार आर.आर.कुंभरे, मंडळ अधिकारी के.बी.शहारे, अव्वल कारकून आर.डी.साखरे, तलाठी बी.टी.वरखेडे, कनिष्ठ लिपीक एस.व्ही.गजभिये, शिपाई डी.जी.रहांगडाले, कोतवाल संतोष बिसेन, गोरेगाव तहसिलचे नायब तहसिलदार एन.एच.वेदी, कनिष्ठ लिपीक अर्चना पारधीकर, मंडळ अधिकारी ए.के.बारसे, तलाठी ओ.एन.येडे, शिपाई स्नेहा मेश्राम, गोंदिया उपविभागीय कार्यालयाचे सुरेश हुमणे, बी.झेड.बिसेन, मंडळ अधिकारी के.डी.गजभिये, तिरोडा नायब तहसिलदार संदीप मासाळ, तलाठी एन.एम.डगावकर, तलाठी एम.पी.मलेवार, सडक/अर्जुनी तहसिलचे मंडळ अधिकारी आर.एल.रहांगडाले, तलाठी श्री.नंदागवळी, अव्वल कारकून श्रीमती पंचीलवार, कनिष्ठ लिपीक बी.बी.बरींगे, गोपाल वलथरे, आमगाव तहसिलचे मंडळ अधिकार के.पी.कोरे, अव्वल कारकून आर.डी.रहांगडाले, तलाठी व्ही.के.पारधी, शिपाई श्रीमती एल.एच.पंधरे, कोतवाल महादेव शिवणकर, देवरी तहसिलचे नायब तहसिलदार बी.के.गुरनूले, अव्वल कारकून यु.बी.पंधरे, कनिष्ठ ‍िलपीक एस.एच.बडवाईक, शिपाई एन.एस.मरस्कोल्हे, कोतवाल कृष्णकुमार डोकरवारे, अमृतलाल बोहरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहायक अधीक्षक जी.डी.किरीमकर, मंडळ अधिकारी बी.सी.कोल्हटकर, अव्वल कारकून हर्षद लांजेवार, शिपाई एस.जी.अंबादे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गोंदिया तालुक्यातील खमारी येथील पल्लवी डोये, नर्मदा किरसान, मुनीश्वरी ताराम, शामकला सिलोटे, दुर्गाबाई माने या महिला मजूरांना रोजगारपत्रक वितरीत करण्यात आले. अदासी/तांडा येथील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेश शुभांगी ढाले, उर्मिला फटे, प्रियंका गजभिये, उषा यादव, कल्पना भालाधरे व राहूल कहालकर यांना देण्यात आले. अपंग लाभार्थी सलोनी उके, निलेश चवरे, खिलेश चवरे, रिंकू दुबे, करण डोहरे, दिपिका वाढई, दामिनी वाढई यांना धनादेश व कागदपत्रे, अपंग निराश्रीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, पिंडकेपार येथील छोटेलाल बिसेन यांचा वीज पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना ४ लक्ष रुपये धनादेश सुरक्षा ठेव म्हणून देण्यात आले. निशांतगिरी गोस्वामी, सुषमा रहांगडाले, पल्लवी किरणापुरे, सोनाली चौधरी यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कोतवाल राजकुमार वासनिक यांची मुलगी मनीषा वासनिक ही बी.ई. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असल्याबद्दल तीचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
वनहक्क पट्टयाचे वाटप विजय बहेकार, सुरजलाल उके नंगपुरा (आमगाव) हितेश रहांगडाले दहेगाव, भाऊलाल पटले चिरचाळबांध, राधेश्याम शेंडे आमगाव यांना अधिकारपत्र देण्यात आले. वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये भूमिस्वामीचे पट्टे वाटप नंदलाल उईके, दुधराम मडावी, उर्मिला कोराम, भगवान कोराम यांना करण्यात आले. धुरनलाल बसेने यांनी सात-बारा उताऱ्यावर पत्नीची सहखातेदार म्‍हणून नोंद केल्याबद्दल त्यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला तहसिलदार सर्वश्री के.डी.मेश्राम, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, प्रशांत सांगडे यांच्यासह नायब तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत घुरुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी मानले.