मुर्री रस्त्यावर पडले खड्डे,कंत्राटदाराचे पितळ उघड

0
10

नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
गोंदिया,दि.१-: पावसाळ्यापूर्वी एक कोटी ३४ लाख रुपयांच्या मुर्री रस्त्याच्या बांधकामाला सुरवात झाली. मात्र, अल्पावधीत पहिल्याच पावसाळ्यात हा रस्ता वाहून गेला. जागोजागी खड्डे पडल्याने आवागमन करणाèयांना जीव मूठीत घ्यावा लागत आहे. दरम्यान, रस्त्याच्या खस्ता हालतवर नाराजी व्यक्त करीत रहिवाश्यांनी आगामी नगर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.सदर रस्ता हा असाटी नामक कंत्राटदाराने तयार केला असून अल्पावधीतच या रस्ताबांधकामाची पोलखोल पावसाने केली आहे.शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याची पोलखोल झाली. संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेला आहे. जागोजागी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने आवागमन करणाèया पादचारी व वाहनधारकांना जीव मूठीत घ्यावा लागतो. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकजण खड्ड्यात पडून जखमी सुद्धा झाले आहेत.