विदर्भासाठी वेगळी काँग्रेस कमिटी बनवा – मधुकर किंमतकर

0
5

नागपूर, दि. ३ – विदर्भासाठी काँग्रेसने स्वतंत्र प्रदेश कमिटी स्थापन करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य मधुकर उर्फ मामा किंमतकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. सिंचनासाठी संपूर्ण राज्याचा निधी जरी विदर्भाला दिला तरी पुढील २५ वर्षे अनुशेष भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय आता पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भातून पुन्हा एकदा घरचा अहेर मिळाला आहे. किंमतकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भासोबत केलेला करार कधीच पाळला नाही. सातत्याने अन्याय केला.