शाळेला बुट्टी मारुन हाॅजराफाॅलला जाणार्या विवेक मंदीरच्या विद्यार्थीचा अपघात

0
24

गोंदिया,दि.4 :-सालेकसा तालुक्यातील निसर्गरम्य हाॅजराफाॅल धबधबा बघायचे म्हटले की कुणाच्याही मनात उत्कंठा आल्याशिवाय राहणार नाही.त्यातच दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने तर या धबधब्याला नयनरम्य असे बनविले आहे.हा धबधबा बघण्याची हौस मनात घेऊन गोंदियाच्या विवेक मंदिर शाळेच्या विद्यार्थिनीनी शाळेला बुट्टी मारत स्कुटीने जायला निघाला.परंतु पहिल्यादाच या मार्गावर जाणार्या या विद्यार्थीनींना रस्त्याची व वळणरस्ताची योग्य माहिती नसल्याने पानगाव जवळील वळणरस्त्यावर वाहनचालवितांना ताबा सुटल्याने स्कुटीवरील दोन विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटना बुधवारला सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.जखमी तरुणी मध्ये श्रृतिका गुप्ता आणि दर्शिका पुजारा यांचा समावेश असून त्यांच्यावर गोंदिायाच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.
माहितीनुसार विवेक मंदिर स्कूलमधील सीबीएसई माध्यमाच्या दहाव्या वर्गात शिकणार्‍या चार मुली आणि चार मुले हे हाजराफॉलचा धबधबा पाहण्यासाठी सकाळी शाळेत न जाता चार दुचाकी वाहनाने निघाले होते.या पैकी श्रृतिका व दर्शिका या दोघी एका स्कुटीवर बसल्या होत्या. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान पानगावच्या तलावाजवळील वळणाला श्रृतिकाचा स्कुटीवरील ताबा सुटला व अपघात घडला व रस्त्यालगतच्या दगडावर आदळून स्कुटीचे मधातून दोन तुकडे झाले.त्या विद्यार्थ्यांसाठी हा परिसर अनोळखी असल्याने ते लोकांना मदत मागण्यासाठी घाबरत होते.मात्र एवढय़ात सालेकसा मार्गाने येणार्या मंगेश ठाकरे या प्राध्यपकाला शालेय गणवेशात विद्यार्थी रस्त्याच्या कडेला पडल्याचे दिसताच त्यांनी जखमी श्रृतिकाला उचलून ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे नेले.व तिथे प्राथमिक उपचार केल्या नंतर १0८ क्रमांकावर अँम्बुलेन्स बोलावून गोंदियाला हलविले.यासोबत शुभांशू आंबेडकर,आकांक्षा चौरसिया व इतर चार असे एकूण आठ विद्यार्थी होते. आई-वडिलांना न सांगताच ते शाळेच्या गणवेशावर हाजराफॉलला जायाला निघाले होते.विशेष म्हणजे विवेक मंदिर स्कूल या शाळेत दहावीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला बाईक – स्कुटी अशा वाहनांनी येण्यास मनाई असताना या प्रकरणामुळे मात्र शाळा व्यवस्थापनाची पोलखोल झाली आहे.एकाच वर्गातील आठ वियार्थी गैरहजर असताना त्यांची माहिती पालकांना का कळविली गेली नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे.