युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन

0
11

सडक अर्जुनी,दि.5- गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या आदर्श गावाला लागून पाच कोटी रुपये खर्चून नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने युवक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने पुलावरील खड्यात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. तर या ठिकाणी रोवण्यात आलेल्या धान पिकांच्या उत्पनातून पुलाची दुरुस्ती करू असा पवित्रा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किशोर तरोणे यांनी घेतला आहे.विशेष ज्या नाल्यावर हा भव्यदिव्य पूल तयार करण्यात आला तेवढ्या मोठ्या पुलाचीही गरज नव्हती या पुलामूळे नजीकच्या शेतीचे भविष्यात मोठे नुकसान होणार आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या विधान सभा क्षेत्रातील कणेरी राम या आदर्श गावाला लागून असलेल्या नाल्यावरील लहान पुल नेहमीच पावसाळ्यात बंद राहत असल्याची अडचण लक्षात घेत आणि कोहमारा-वडसा हा राज्यमार्ग असल्याने या ठिकाणी पूलाचे बांधकाम मंजुर करण्यात आले होते.या पुलाचे बांधकाम सुरु असून या वर्षीच हे काम ९५ % पूर्ण झाले. मात्र नवीन पुलाला लागूनच जुना पूल असून या आठवड्यात आलेल्या दमदार पावसाने जुन्या पूलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आणि लोखंडी सळ्या दिसायला लागल्याने कंत्राटदाराने जुन्या पुलावर अपघात घडू नये म्हणून नव्या पुलावरून वाहतूक सुरु केली.gondia-pik-2-293x165
मात्र पहिल्याच पावसाने नवीन पुलाचे काम किती गुणवत्तेने करण्यात आल्याचे प्रमाणपत्र या आठवड्यात आलेल्या दमदार पावसाने दाखवून दिले. त्यामुळे कंत्राटदाराची चांगलीच फजिती झाली आहे .मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया याच्या अधीरेखीस ह्या पुलाचे काम नागपुरातील एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने पुलावर पहिल्याच पावसात मोठं-मोठे खड्डे पडले .त्यामुळे रात्री-बेरात्री या ठिकाणी अपघात होत असल्याचा आरोप युवक राष्टवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किशोर तरोणे यांनी केला आहे .मात्र या दोषी कंत्राटदारावर मंत्री साहेब काय कार्यवाही करतात कि इतर मंत्र्यांप्रमाणे कंत्राटदाराची पाठ राखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.