अा.अग्रवालांवरील हल्याप्रकरणाची तपासणी 15 दिवसात पुर्ण करु-मुख्यमंत्री

0
8

मुंबई,दि.5- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याबाबतची तपासणी येत्या 15 दिवसांत विशेष अधिकाऱ्यामार्फत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.गेल्या 9 एप्रिल रोजी भाजपचे नगरसेवक शिव शर्मा यांनी पत्रकारपरिषदेत येऊन त्यांना मारहाण केली होती.यासदंर्भात महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये विधानसभा सदस्य गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत राज्य शासनामार्फत करण्यात आलेली कार्यवाही याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, सदस्य अब्दुल सत्तार यांनी मांडली होती.

त्यावर बोलतांना फडणवीस यावेळी म्हणाले, या प्रकरणाची संपूर्ण तपासणी तेथील स्थानिक पोलीस अधीक्षकामार्फत करण्यात येत आहे. या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसचे ही चौकशी येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. सदर चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यामार्फत करुन विधानसभा सदस्य गोपालदास अग्रवाल यांच्या मुलांवर लावण्यात आलेले आरोप, नोंदविण्यात आलेले गुन्हे याबाबतही तपासणी करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जाणीवपूर्णक गुन्हा नोंदविण्यात आला आहे किंवा कसे, हे सुद्धा तपासून पाहण्यात येणार असल्याचे सांगितले.