जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी- पालकमंत्री बडोले

0
8

गोंदिया,दि.१५ : जिल्ह्यातील विविध घटकातील गरजु लाभाथ्र्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी योग्य नियोजनातून योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आपला भर राहणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम कारंजा पोलीस कवायत मैदान येथे झाला. यावेळी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, नवेगाव नागझिरा वन्यजीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ दलित वस्त्यांचा दोन वर्षात सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष योजना कार्यान्वीत करण्यात येतील. सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅबचा निश्चितच उपयोग होईल. ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरीत करण्यात येईल असे ते म्हणाले.
जिल्ह्यात चालू हंगामात नैसर्गीक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या धान उत्पादक शेतकèयांना प्रति क्विंटल २०० रुपये प्रोत्साहन राशी बोनस म्हणून देण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, याचा लाभ जिल्ह्यातील ४६ हजार ४८१ धान उत्पादक शेतक?्यांना झाला असून त्यांना ३० कोटी १३ लक्ष रुपये बोनस म्हणून देण्यात आला आहे. आगामी महासमाधान शिबिरात ४० हजार पेक्षा जास्त लाभाथ्र्यांना लाभ देण्याचे नियोजन असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
गोंदिया येथे यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याची माहिती देवून श्री.बडोले पुढे म्हणाले, ३ हजार ६४१ शेतकèयांच्या कृषी पंपांना वीज जोडणी मागील वर्षी दिली असून यावर्षात जुलै अखैर ६५० शेतकèयांना वीज कनेक्शन दिले आहे. त्यामुळे त्यांना आता दुबार व तिबार पिके घेता येणार आहे. जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महत्वाची ठरली असून यावर्षात जुलै अखेर १ लाख ६ हजार ३२२ कुटुंबांना रोजगार देण्यात आला आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून १५ हजार ४१२ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. वनालगतच्या गावातील ११ हजार ५०१ कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. कायापालट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्था सुसज्ज होत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त पर्यटक येण्यासोबतच स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण कसा होईल या दृष्टीने आपले नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, शीघ्र कृती दल, होमगार्ड पथक, स्काऊट- गाईड पथक, बँड पथक, बिट मार्शल पथक, निर्भया पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक यांनी संचलन केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाèया अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा सत्कार केला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप बडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी विकास ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, श्री.बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.