ढाकणीच्या ग्रामसेवकावर सरपंचाने लावलेले आरोप चुकीचे-पत्रपरिषदेत सदस्यांची माहिती

0
11

गोंदिया- तालुक्यातील ढाकणी ग्रामपंचायतीतर्गंत बांधकामाला सुरवात होण्यअगादोरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २० हजार रुपयाची मागणी करणाèया महिला सरपंचाला विरोध करणाèया ग्रामसेवकाविरुद्धच मारहाण व धक्काबुकी केल्याची तक्रार करून आपण मागासजातीचे असल्याने आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याची माहिती ढाकणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.जी.सोनवणे यांच्यासह ग्रा.प.चे उपसरपंच नानेश्वर राऊत,ग्रामपंचायत सदस्या श्रीमती पद्माताई मेश्राम,रंजनाताई मस्करे,खांडेकर यांच्यासह माजी जि.प.सदस्य रेखलाल टेंभरे,ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
या पत्रपरिषदेत माहिती देताना ढाकणी ग्रा.प.च्या सदस्या पद्माताई मेश्राम म्हणाल्या की सरपंच या महिला असून ग्रामपंचायतीच्या प्रत्येक मासिक बैठकीला त्यांचे पती हे शासकीय बैठकीत येऊन ढवळाढवळ करतात.ग्रामसेवक सोनवणे हे आधीच अपंग असून त्यांना धमकावीत असतात असेही सांगितले.सोनवणे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसह सर्वच निधीची माहिती सर्व सदस्यांना नेहमी देत असतात किती शिल्लक आहे व किती खर्च झाले.परंतु ही माहिती कुणाला कशाला सांगता फक्त मलाच सांगत जा असे सरपंचाचे म्हणणे असते.१४ व्या वित्त आयोगातून पाणी टाकीचे बांधकाम करावयाचे असून त्यासाठी गावपातळीवर ग्रामसभेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर त्या निधीचा उपयोग त्या समितीच्या माध्यमातून करावयाचे आहे.परंतु त्या आधीच पैशाची मागणी करणे त्यातच १४ व्या वित्त आयोगात मंजूर झालेल्या नालीबांधकामाचे काम सुरू होण्याआधीच २० हजार रुपये अग्रिम एडवांस म्हणून काढण्याची मागणी केली,त्यावर सचिव सोनवणे यांनी विरोध केला असता मला धक्काबुक्की व मारहाण केल्याची खोटी तक्रार गोंदिया पोलिसात दिल्याचे पत्रकार परिषदेत श्रीमती मेश्राम व सचिव सोनवणे यांनी सांगितले.ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये बोअरवेल खोदकामासंदर्भात एकमुखाने निर्णय झालेला असताना सरपंच व त्यांचे पती या कामात ढवळाढवळ करून विशिष्ट व्यक्तींच्या निर्देशावर बैठक बोलावून जागा बदलविण्यासाठी दबावतंत्राचा वापर करतात असेही सांगितले.या आधी येथे कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैद्य यांना सुद्धा खोट्याप्रकरणात त्यांना मानसिक त्रास या सरपंच महोदयांच्या कुटुबांच्यावतीने देण्यात आल्याचे सांगण्यात आले.जिल्हा प्रशासनाने ढाकणी ग्रामपंचायतीच्या या कारभाराची व महिला सरपंचाचे पती करीत असलेल्या ढवळाढवळीची चौकशी योग्यरीत्या करून कुठलीही चूक नसलेल्या ग्रामसेवकावर खोटी कारवाई झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे उपसरपंच नानेश्वर राऊत,सदस्या पद्माताई मेश्राम,रंजना मस्करे व श्री खांडेकर यांनी सांगितले.