रेल्वेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

0
9

नागपूर – दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा लाचखोर विभागीय भंडारण व्यवस्थापक सीबीआयच्या जाळ्यात अडकला. मंगळवारी 20 हजारांची लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घर आणि कार्यालयावरी छापे टाकून चौकशी केली.

वरिष्ठ विभागीय भंडारण व्यवस्थापक अजयकुमार असे सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी त्याच्या कार्यालयातच सापळा रचून ताब्यात घेतले. सूत्रांच्या माहितीनुसार, अजयकुमारने रेल्वेला यंत्रसामग्री पुरविणाऱ्या एका कंपनीच्या संचालकाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. प्रारंभ त्याने पैसे देण्यास नकार दिला. मात्र, भविष्यात अडचणी येण्याची शक्‍यता होती. अखेर संचालक आणि अधिकाऱ्यात झालेल्या चर्चेत 20 हजार रुपये देण्याचे मान्य केले. परंतु, लाच द्यायची नसल्याने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआय नागपूरच्या एसीबी शाखेने सापळा रचून अजयकुमारला ताब्यात घेतले. अधिकाऱ्याने सहकार्याची ग्वाही देण्याचे मान्य केल्यानंतर त्याचे घर आणि भंडारण विभागात चौकशी सुरू करण्यात आली.