ब्रिटिशकालीन रेल्वे फाटक बंद करण्याच्या विरोधात सालेबर्डीवासियांचे आंदोलन

0
7

गोंदिया,दि.5- जिल्ह्यातून जाणार्या मुंबई हावडा रेल्वेमार्गावरील तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी येथील रेल्वेफाटक आजपासून बंद करण्याचा रेल्वेप्रशासनाच्या निर्णयाविरोधात माजी आमदार दिलीप बनसोड व जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात सालेबर्डीसह परिसरातील गावच्या नागरिकांनी आज सोमवारला रेल्वेचौकीसमोर आंदोलन केले. आंदोलनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघून दपूमरेल्वे नागपूर विभागाच्या अधिकार्यानी जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही,तोपर्यंत रेल्वेचौकी सुरु ठेवण्याचे आस्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
सालेबर्डी गावाला लागून असलेल्या रेल्वेमार्गावर मागील शंभर वर्षापासून रेल्वे फाटक असून .याच रेल्वे फाटकातून पाच गावातील लोकांचे येणे जाणे आहे..मात्र चौकीवर काम करणाऱ्या लोकांनी गावकर्यांना हि रेल्वे फाटक ५ सप्टेंबर पासून बंद होणार असल्याची माहिती देताच .गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आणि ग्राम पंचायत,जिल्हा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता. जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरील रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतल्याने रेल रोको आंदोलन करण्याची भूमिका घेतली.त्यानुसार आज सकाळीच गावातील नागरिक रेल्वेचौकीजवळ एकत्र आले ते विदर्भ एक्सप्रेस या गाडीला थांबविण्याच्या मनस्थितीत असतानाच रेल्वेच्या अधिकायानी मध्यस्थीची भूमिका घेत मुबई हावडा रेल्वे लाईन हि हाय स्पीड रेल्वे लाईन असल्याने या ठिकाणची रेल्वे फाटक बंद करून रेल्वे अंडरग्राऊंड ब्रिज तयार करण्याची भूमिका घेतल्याचे माहिती तुमसर रेल्वेस्थानकावरील अभियंता बी.एम.पांडे यांनी आंदोलकांना माहिती दिली.त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.