भारतीय संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन व उत्थान कार्यशाळा

0
15

गोंदिया: स्थानिक भवभूति रंगमंदिर, रेलटोली येथे सास्कृंतीक मंत्रालय, भारत सरकार व विद्या भारती संस्कृती शिक्षण संस्थेच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत दिनेशभाई पटेल,सचिन जोशी व अनिल जोशी यांच्या व १० शाळेतील जवळपास ५०० विद्याथ्र्यांच्या उपस्थितीत ‘भारतीय संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन व उत्थान या विषयावरील कार्यशाळा पार पडली.आजच्या आधुनिक युगात आपल्या संस्कृतीला कायम ठेवून तीच संरक्षण व संवर्धन करून आपल्या देशाला प्रगत आणि संघटित राष्ट्र कसे करता येईल यावर ही कार्यशाळा पार पडली.अनिल जोशी यांनी सांस्कृतिक बाबींच आढावा देत भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थांना पटवून दिले. डॉ विजय सूर्यवंशी यांनी विद्याथ्र्यांसी चर्चात्मक संवाद साधला.आपण मोठे होउन अधिकारी, राजनेता, शेतकरी, व्यापारी वगैरे बनत असतो पण आपण जर आपल्या संस्कृतीला जोपासून आपले कर्तव्य केले तर आपल्या देशाचा भविष्य उज्वल करता येवू शकतो. विविध शाळेंनी सांस्कृतिक झाँकी व समूहगान सादर केले. समारोप श्रीकांत देशपांडे,मनोज भुरे,सुरेश चन्ने व कार्यशाळा प्रांत प्रमुख सौ सुवर्णा पावडे यांच्या उपस्थितीत पार पडले.संचालन कार्यशाळा जिल्हा संयोजक वरुण खंगार व सौ चारुलता ढेकवार तर आभार अनिल बहेकार यांनी केले.