पाळ फुटून शेकडो एकरातील धानपीक बुडाले

0
17

वरठी : मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळफुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे. या भागातील ३0 ते ४0 शेतकर्‍यांच्या २00 एकरातील धानपीक पाण्याखाली असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
वरठी गावालगत लघु पाटबंधारे विभागाचे दोन तलाव आहेत. १९८0 च्या दशकातील हे तलाव दुर्लक्षीत आहेत. मागील ३५ वर्षापासुन या तलावाकडे लघु पाटबंधारे विभागाने पाहले नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केली आहे. देखभाल दुरूस्ती नसल्यामुळे तलावाच्या एका भागात अनेक दिवसांपासून पाणी वाहत होते. नहराचे पाणी सुरू असल्यामुळे तलावात पाणी भरून होते. आज शुक्रवारला दुपारपासून तलावाच्या पाळीची माती निघणे सुरू झाले होते. त्यातून कमी प्रमाणात पाणी वाहत होते. सायंकाळच्या सुमारास तलावाच्या पाळीच्या मोठय़ा भागाने जागा सोडल्यामुळे तलावातील पाणी शेतात शिरले. काही वेळेपुरते संपुर्ण परिसर पाण्यात बुडाले होते. अजुनही शेकडो एकर शेती पाण्याखाली असुन या शेतातील पीक नष्ट झाले आहे.
या तलावाच्या परिसरात वरठी, मोहगाव, सोनुली येथील शेतकर्‍यांची शेती आहे. यात पुरूषोत्तम मरघडे, वामन मरघडे, रामप्रसाद मरघडे, भाग्रता देशमुख, झिंगर मरघडे, मंगर मरघडे, प्यारेलाल मरघडे, गुलाब वाल्मीक, लक्ष्मण थोटे, वामन थोटे, शामराव थोटे, नामदेव थोटे, संतोष थोटे, राजु भाजीपाले, विश्‍वकांत भुजाडे, चंद्रकांत भुजाडे, शशिकांत भुजाडे, पवनदास मेo्राम, दामोधर गायधने, शिवा गायधने, भिवा गायधने, सुधाकर गायधने, गंगाधर गायधने यांच्यासह अन्य शेतकर्‍यांचे शेतपिक पाण्यात बुडाले आहे. तलावाची पाळ फुटल्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान वरठीचे सरपंच संजय मिरासे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावाची पाळ फुटल्याचा आरोप केला