दुग्ध व्यवसायात धवल क्रांती घडवू-रामलाल चौधरी

0
8

भंडारा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांसह बेरोजगारांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे. दुग्ध व्यवसायाने यशोगाथा निर्माण केली आहे. अशा या व्यवसायाची दुग्ध संघाच्या माध्यमातून धवल क्रांती घडवू असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी यांनी व्यक्त केले.

शहरातील मंगलम सभागृहात भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, जयंत वैरागडे, नामदेव सेलोकर, श्रीकृष्ण पडोळे, मुरलीमनोहर खंडेलवाल, माधव बांते, रामराव कारेमोरे, यादवराव कापगते, मारोती मस्के, दुलीचंद बिसने, सुमित हेडा, प्रणय झंवर, प्रशांत देशकर, गौतम बन्सोड, एन.डी. बोरकर, दुधराम भुरले, छाया पटले, संचालक सदाशिव वलथरे, महेंद्र गडकरी, नरेश धुर्वे, रामनारायण गाजीमवार, विनायक बुरडे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, संतोष शिवणकर, रिता हलमारे, अनिता येळणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी चौधरी यांनी दुग्ध संघाचे प्रतिनिधी व दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे संघ प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संघाला भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीकडे नेण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. सभेचे संचालन व आभार संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले. सभेला संघाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.