अकोल्यात मराठा मोर्चाला मोठा प्रतिसाद

0
3

अकोला  berartimes.com दि. १९ –– कोपर्डीप्रकरणाचा निषेध, अॅट्रासिटीमधील बदल आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी अकोला शहरात आज (सोमवार) निघालेल्या सकल मराठा मूक क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज जालना, लातूर आणि अकोला शहरात मूकमोर्चेे काढण्‍यात आले. लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. संयोजकांनी दिलेल्‍या आकडेवारीनुसार, तीन शहरांमध्‍ये सुमारे 49 लाख मराठा बांधव एकवटले होते. तर, पोलिस म्‍हणतात तीन्‍ही शहरात 22 लाख मराठा बांधव एकत्र आले होते. लातूर, जालना आणि अकोला या तिन्‍ही मोर्चांचा समारोप झाला आहे.

मोर्चातून मागण्‍या..
– कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी.
– अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवून योग्य तो बदल करण्यात यावा.
– मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
– शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी.
– स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.