स्वच्छतेसाठी रेल्वेचे विशेष अभियान-डॉ. सुगंधा राहा

0
12

berartimes.com गोंदिया,दि.22:- केंद्र शासनाने स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत हे ब्रिद घेउन रेल्वे प्रशासन कार्य करत आहे. त्या करीता नउ दिवस प्रत्येक बाबीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हे अभियान १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. आज गुरूवारी स्वच्छ सहयोग दिवस पाळण्यात आला. दरम्यान गोंदिया  रेल्वे स्थानकावर नागरिकांना स्वच्छतेचा मुलमंत्र देण्यात आला, अशी माहिती दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वेच्या मुख्य आरोग्य अधिक्षक डॉ. सुगंधा राहा यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना दिली.
येथील रेल्वे स्थानकावर आयोजीत स्वच्छता जनजागृती अभियानाकरीता आल्या असता त्या  बोलत होत्या. डॉ. सुगंधा राहा माहिती देताना म्हणाल्या की, रेल्वेने स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. त्याकरीता स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ स्टेशन, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छ निर, स्वच्छ परीसर, स्वच्छ सहयोग, स्वच्छ संवाद आणि स्वच्छ समर्पण, स्वच्छ आहार, हे उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून प्रवाश्यांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक किंवा रेल्वेगाडीत अस्वच्छता पसरविणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी आपला प्रवास सुखकर होण्याकरीता रेल्वेप्रशासनाला सहकार्य करावे मोठ्या रेल्वे स्थानकावर प्रायोगीक तत्वावर दोन कचरा पेट्या ठेवण्यात येणार आहे. हिरव्या रंगाच्या कचरा पेटीत उरलेले अन्न बिस्किट आणि फळांचे टरफल टाकावे. तर काळ्या रंगाच्या कचरा पेटीत प्लास्टीक चा कचरा टाकावा असे आवाहन डॉ. सुगंधा राहा यांनी केले आहे.