२४ सप्टेंबरला ओबीसी संघर्ष कृती समितीची जिल्हा बैठक

0
12

8 डिसेंबरच्या मोर्च्यावर लोकप्रतिनिधींचे विचार घेणार

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी शनिवारी गोंदियात

गोंदिया: ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाच्यावतीने येत्या २४ सप्टेंबर २०१६ रोज शनिवारला दुपारी 1 वाजता मयुर लाॅन कंटगी येथे ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल तसेच ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित मोच्र्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य़ बबनराव तायवाडे, निमंत्रक सचिन राजुरकर, संघटक शेषराव येलेकर,भुषण दळवे, डी.डी.पटले, गुणेश्वर आरीकर, डॉ. एन.जी.राऊत, विनोद उलीपवार,प्रा.रमेश पिसे,मनोज चव्हाण, निकेश पिने, सुषमा भड, शुभांगी मेश्राम‘, प्रा.सदानंद माळी, पांडूरंग काकडे,बबनराव फंड,गोविंद वरवाडे आदी मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व समाजबांधवांना तसेच ओबीसी लोकप्रतनिधींना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वèहाडे,सयोंजक खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम. करमकर,संघटक कैलास भेलावे,उपाध्यक्ष मनोज मेंढे,प्रा.रामलाल गहाणे, शिशिर कटरे,भरत पाटील, उमेंद्र भेलावे, विनोद चौधरी,आशिष नागपूरे,प्रा.संजीव रहांगडाले,हरिष ब्राम्हणकर, खुशाल कटरे,उद्वव मेहंदळे, रेखलाल टेंभरे,दिनेश हुकरे, विलास चव्हाण,डॉ.संजय देशमुख,राजेश चांदेवार,राजेश नागरीकर,धन्नालाल नागरीकर,कृष्णा बहेकार,गणेश बरडे,मुरलीधर करंडे,गजेंद्र फुंडे,विजय बहेकार,लिलाधर पाथोडे आदिंनी केले आहे.