मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तिरोडा- करटी रस्त्याचे भूमिपूजन

0
9

तिरोडा,दि.25 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मौजा कवलेवाडा येथे तिरोडा-कवलेवाडा करटी रस्त्याचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आ.रहांगडाले म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एका आर्थिक वर्षामध्ये एका विधानसभा क्षेत्रात एकूण २७ कि.मी. रस्ते बांधकामाचे उद्दीष्ट आहे. यातूनच आपल्या विधानसभा क्षेत्रातील तिरोडा तालुका ते तुमसर तालुक्याला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्यामुळे सर्वप्रथम या रस्त्याची निवड करण्यात आली.
रस्त्याची रुंदी सदर योजनेमध्ये जास्तीत-जास्त ३.७५ मीटर असून सुद्धा या रस्त्यावर तालुक्यातील सर्व मुख्य कार्यालये (तहसील कार्यालय, पंचायत समिती, सा.बा. उपविभागीय कार्यालय, पशु वैद्यकीय कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जीवन प्राधीकरण, वीज कंपनी) असल्यामुळे रेल्वे स्थानक रस्त्यापासून ते मजिप्रा कार्यालयापर्यंत ५ मीटर रूंदीच्या रस्त्याकरिता विशेष मंजुरी आणण्यात आली. त्यापुढील संपूर्ण रस्ता हा ३.७५ मीटर रुंदीचा बनणार आहे. कवलेवाडा क्षेत्रामध्ये विविध विकासकामे घेण्यात आली असून डांबरी रस्त्याच्या कामांना लगेच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, पं.स.सदस्य वी.एस. रहांगडाले, रमणिक सयाम, पवन पटले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, तुमेश्‍वरी बघेले, सलामभाई शेख, डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजयसिंग बैस, सरपंच देवनबाई पारधी, जयसिंग ऊपासे, ललीत परिहार, शिवलाल परिहार, महादेव कटणकर, पिंटू रहांगडाले, मिलींद कुंभरे, निरज सोनेवाने, खुमेश बघेले, भुमेश्‍वर रहांगडाले, स्वानंद पारधी, कैलाश कटरे, सुधीर येळे, विवेक डोरे आदी उपस्थित होते.