ओबीसीसांठी संवैधानिक अधीकाराची लढाई- बोपचे

0
14

अर्जुनी/मोरगाव:- संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० नुसार ओबीसींच्या हक्काची तरतूद केली. मात्र, गेली ६० वर्षे राजकिय इच्छाशक्तीच्या अभावाने देशात ७५१ ओबीसींवर अन्याय सुरू आहे. इंग्रजी राजवटीनंतर ओबीसींची जणगणणाच झाली नाही. आम्हाला कुठल्याही जाती किंवा धर्माला विरोध नाही. आम्हाला आमचे संवैधानिक अधीकार मिळावेत. आम्ही कुठल्याही राजकिय पक्ष अथवा शासनाच्या विरोधात नाही. येणाèया ८ डिसेंबर आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसींनी एकत्र येऊन सरकारला जाग आणावी असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी केले. ते ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड मध्ये आयोजीत सभेत बोलत होते. यावेळी जिवन लंजे, जि.प. सदस्य किशोर तरोणे, खेमेंद्र कटरे, गिरीष बागडे, नविन नशीने, सेवा.सह. संस्था संचालक लोकेश हुकरे, ललीत बाळबुध्दे, नगरसेवक मुकेश जायस्वाल, राजू शिवणकर, मनोहर शहारे, बालू बडवाईक, रत्नाकर बारेकर, ओम प्रकाश सिंह पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नुतनलाल सोनवाने, अश्वीन गौतमख् चेतन शेंडे, कृ.उ.बा.स. संचालक सोमेश्वर सौदरकर, राहूल ब्राम्हणकर, राजू बेरीकर, प्रा. भालचंद्र पटले, कृ.उ.बा.स. संचालक प्रमोद लांजेवार उपस्थित होते.