ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला गोंदियातील “तो” युवक कोण?

0
11
नागपूर पोलीसांनी पकडलेल्या युवतींने सांगितले गोंदियाचे नाव
बाजारचौकात असलेल्या एका व्यवसायकाच्या मुलाच्या सहभागाची चर्चा
गोंदिया,दि.28:- गोंदिया शहर हे तसे विविध कारणांनी ओळखले जाते.आधीपासूनच गोंदियाची मिनी मुंबई अशी ओळख व्यवसायीक क्षेत्रात आहे.कारण या शहरात यापुर्वीही नकली निरमा,नकली मेवा,मिठाईसह दुचाकी वाहनातील आॅईलमध्येच नव्हे तर औषधी विक्रीत आघाडीवर असल्याची चर्चा होती.नकली दारुच्या वाहतुकीसाठी गोंदिया जिल्हा नवा नाही.परंतु आत्ता हळूहळू या शहरातील युवकामध्ये ड्रग्स,कोकीनसारख्या नशेचे पावडर गोंदिया शहरात दाखल झाले असून 20 आॅक्टोंबरला नागपूर पोलीसांनी ड्रग्स पोचविणार्या एका युवकासह युवतीला ताब्यात घेताच त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरुन नायजेरिया येथून मुंबई मार्गे गोंदियाला ड्रग्स(कोकीन),व्हाईट व क्रिस्टलचे पावडर गोंदियात पोचविले जाणार असल्याची माहिती पोलीसांना दिली होती.विशेष म्हणजे या व्यवसायात गोंदियातील एका प्रतिष्ठित व्यवसायीक असलेल्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा सहभागी असल्याचे बोलले जात असून गोंदियात तर “तो” युवक कोण  या चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे हा युवक बाजारचौकातील एका व्यवसायीकाचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे.या संदर्भात नागपूरातील अनेक वृत्तपत्रांनी हा प्रकार गोंदियात सुरु असल्याचे वृत्तही प्रकाशित केले आहे.
नायजेरियातून आयात करण्यात येत असलेल्या व्हाइट आणि क्रिस्टल नामक ड्रग्सला गोंदियातील महाविद्यालयीन युवकांमध्ये चांगलीच मागणी असल्याची चर्चा असून कुडवा नाका,अभियांत्रीकी महाविद्यालय परिसरात अशा युवकांची गर्दी असल्याचे बोलले जाते. महाविद्यालयीन युवकासंह गोंदियातील काही धनाढ्य लक्ष्मीपुत्रांना या नशेची सवय लावण्यासाठी काही युवक काम करीत असल्याची चर्चा असून मोक्षधाम मार्गावरील भागात सुध्दा अशा प्रकाराला चालना देण्यासाठी काही असामाजिक तत्व काम करीत असल्याची चर्चा आहे. गोंदिया पोलीसांनी जिल्ह्यात शिरकाव होत असलेल्या डॅग्सच्या पुरवट्यावर नकेल कसण्याची गरज निर्माण झाली असून पोलीसांनी कितीही मोठा धनाढ्य व्यापारी,राजकीय पाठबळ असलेल्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचाही व्यक्ती असला तरी त्याचा शोध घेऊन तडीपारच नव्हे तर तुरुंगात डाबण्यासाठी सार्थक पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
व्हाइट आणि क्रिस्टल ड्रग्स घेतल्याच्या नंतर नशेच्या शौकीन युवा रजनीगंधा, पानबहार तसेच पान पराग च्या पाउच किंवा डबा घेउन त्याच्यात  ड्रग्स मिळवतात. तसेच रजनीगंधाच्या पाउच मध्ये ड्रग्सचे मिश्रण करून, खिश्यात ठेवले जातात आणि शौकच्या हिशोबाने त्याचे चटकारे घेतले जाते. या नशेच्या आदी झालेले युवकांचे प्रतिदिन खर्रे-पाउच का खर्च ३ ते ५ हजार रूपयांपर्यंत पोहोचते. एवढेच नाही तर या घातक नशेची सवय लागते आणि त्याची आपुर्ती काही कारणाने न झाल्यास ते मनोरोगाचे शिकार होउन काहीपण करायला आतूर होतात.
नायझेरीया वरून निघालेला ड्रग्स मुंबईमार्गे गोंदियाला पोहोचत असल्याची माहिती २० आॅक्टोंबर रोजी मुंबईवरून ड्रग्स घेउन निघालेल्या सचिन अंबागुये नामक युवकाच्या अटकेनंतर समोर आले आहे.नागपूर पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अल्ताफ शेख उर्फ बबलू ला ज्यावेळी अटक केली त्यावेळी त्याच्यासोबत २२ ते २४ वर्षिय एक युवती सुध्दा पकडली गेली. त्या युवतीकडून १० ग्रॅम व्हाइट आणि क्रिस्टल ड्रग्स हस्तगत करण्यात आले.त्या युवतीने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार ते ड्रग्स गोंदियात पोहोचविले जाणार होते.चर्चेनुसार गोंदियात व्हाईट कोकीन व क्रिस्टल ड्रग्स ची एक पुडी पात्र हजार ते सात हजार रूपये प्रती ग्राम दराने युवकांना विकले जात असून सदर युवतीच्या माहितीनंतर या व्यवसायाशी संबध असलेला व्यक्ती फरार नव्हे तर शहरातून गायब असल्याचेही बोलले जात असल्याने तो युवक कोण या चर्चांना उधाण आले आहे.