23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच्या मागणीकरीता मोहाडी तालुका सरपंच संघटनेची सभा

ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच्या मागणीकरीता मोहाडी तालुका सरपंच संघटनेची सभा

0
80

मोहाडी: आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या निषेधार्थ मोहाडी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने दि. १५ मे रोजी पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे सभापार पडली. या सभेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र जनगणना कॉलमचा समावेश करण्यात यावा अन्यथा जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला.सभेला ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे यांनीप्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, देशातील ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर न आल्यामुळे शिक्षण, रोजगार, राजकीयप्रतिनिधित्व, शासकीय योजना आणि निधी वाटपामध्ये ओबीसी समाजाला अपेक्षित प्रमाणात न्याय मिळत नसल्याची भावना समाजामध्ये वाढत आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना ओबीसी समाजाचे प्रश्न दुय्यम राहतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ही सभा मोहाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र नागफासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये उपस्थित सर्व सरपंचांनी एकमताने निर्णय घेतला की, जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश न झाल्यास या जनगणनेवर बहिष्कार टाकण्यात यावा तसेच गावागावात जाऊन ओबीसी समाजामध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी.यावेळी ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व, आरक्षण व योजनांचा योग्य लाभमिळण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना अत्यंत गरजेची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच सर्वांनी एकमुखाने ओबीसी कॉलमच्या मागणीसाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करण्याबाबत चर्चा केली.सभेला प्रामुख्याने श्रीकृष्ण मेहर, महिंद्र मते, चांगदेव रघुते, शारदा गाढवे, रेश्माईश्वरकर यांच्यासहतालुक्यातील अनेक सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या अस्तित्व, हक्क व न्यायासाठी स्वतंत्र जनगणना कॉलममिळेपर्यंतलढा सुरू राहील, असा निर्धार यावेळी उपस्थित सरपंचांनी व्यक्त केला.

blank