महावितरणचे मुख्य़ अभियंता श्री जे. एम. पारधी रूजु

0
12

गोंदिया,दि.15 :-  गोंदिया परिमंडळाचे मुख्य़ अभियंता म्ह़णुन आज मंगळवार ला जे. एम. पारधी यांनी महावितरण पदभार स्विकारला आहे .मुळचे भंडारा जिल्हयातील मोहाडी येथिल रहिवासी श्री पारधी यांचे 10 वी पर्यंतचे शिक्ष्ण मोहाडीतच झाले असुन ते एस. एस. सी. च्या परिक्षेत 1976 या वर्षी मेरिट मध्ये आले होते. त्यांनी अकरावी व बारावी चे शिक्षण लाल बहादुर शास्त्री विद्यालय, भंडारा येथुन पुर्ण केले.
श्री पारधी यांनी गव्ह़रमेंट इंजीनियरींग कॉलेज अमरावती येथुन बी. ई. ¼इलेक्टीकल½ 1982 मध्ये पदवी ग्रहण केली. त्यानंतर त्यांनी एल.एल. बी. व एम.बी .ए. ¼एच. आर.½ इत्यादी पदव्या प्राप्त़ केलेल्या आहेत. स्वभावाने मृदुभाषी , अनुशासन प्रिय व चाचणी क्षेत्रातील दक्ष अधिकारी म्हणुन महावितरण मध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांना जनसेवा व वाचनाची आवड आहे.
विद्युत क्षेत्रात एकुण 36 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असलेले श्री पारधी यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1982 मध्ये कनिष्ठ़ अभियंता या पदावरून सुरू केली होती्. त्यांची प्रथम पदस्थापना टाªम्बे कंटोल रूम , मुंबई येथे महावितरण मध्ये ¼पुर्वीची म.रा.वि.म.½ येथे झाली होती. सरळ सेवा भरतीत निवड होऊन श्री पारधी यांनी कक्ष, उपविभाग, विभाग, मंडळ स्थ़रावर कार्य करीत सहायक अभियंता, उप कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता या सारख्या विविध व महत्वपुर्ण पदावर कार्य केले. ते 1985-88 च्या दरम्यान भंडारा विभागीय कार्यालयातील तुमसर ग्रामिण कक्षामध्ये कनिष्ठ़ अभियंता होते. तसेच वर्ष 1988 या वेळेस मुंबई मुख्यालयात सहायक अभियंता या पदावर कार्य केले. त्यानंतर वर्धा मंडळात खरांगणा उपविभागात सुद्वा वर्ष 2004 पर्यंत कार्य केले. वर्ष 2004 ते 2008 पर्यंत कार्यकारी अभियंता, नागपुर येूथे पदस्थ् होते. 2008-2014 या कालावधीत श्री पारधी यांनी वर्धा, नागपुर, पुणे, कोल्हापुर व महाराष्टाªच्या विविध भागात अधिक्षक अभियंता, चाचणी विभाग येथे आपली सेवा दिली.
महावितरण मुख्यालय, मुंबई येथे अधिक्षक अभियंता विजदर नियामक कक्ष या पदावर असलेले श्री पारधी मुख्य़ अभियंता या महत्व़पुर्ण पदावर महावितरण जळगाव परिमंडळ येथे मार्च 2015 पासुन तर कालपर्यंत कार्यरत होते.
त्यांनी म.रा. वि. मं. व आताचे महावितरण मधिल तिन्ही कंपन्यांमध्ये संघटनांचे प्रमुख पदाधिकारी म्हणुन सुद्धा काम केले आहे.
प्रामुख्याने वीज ग्राहकांना उच्च़ दर्जाची सेवा देणे व दिलेल्या सेवेचे मोल वसुल करणे. वीज हानी कमी करणे , नियमीत रिडींग करणे, वीज चोरीवर आळा घालणे यावर मुख्य़भर देण्यात येईल, असे श्री पारधी यांनी आपली प्राथमिकता सांगताना स्पष्ट़ केली .