प्रा. साईबाबाप्रकरणी आजपासून गडचिरोली कोर्टात सुनावणी

0
18

नागपूर : नक्षलवादी चळवळीचा थिंक टँक प्रा. जी. एन. साईबाबाप्रकरणी  मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली सेशन कोर्टात सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे. बुधवार, १६ नोव्हेंबरलाही याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची डे टू डे सुनावणी घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सेशन कोर्टाला दिले होते. या आदेशानुसार साईबाबाविरुद्ध ट्रायल सुरू झाली आहे. प्रा. साईबाबा, हेम मिश्रा, प्रशांत राही, बाळू नानवटे, महेश किरकी, विजय किरकी यांच्याविरुद्ध दाखल आरोपपत्रावर न्यायाधीश एम. एम. शिंदे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत कोर्टाने जवळपास १७ साक्षीदार तपासले आहेत. गडचिरोलीसह देशाच्या विविध भागांतील नक्षली कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपावरून दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक साईबाबा यांना पोलिसांनी अटक केली होती. गडचिरोली येथील पोलिसांनी ऑगस्टमध्ये हेम मिश्रा आणि प्रशांत राही या दोन नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत प्रा. साईबाबा यांचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना दिल्लीत अटक केली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रशांत सत्यनाथन, प्रा. साईबाबातर्फे अ?ॅड़ सुरेंद्र गडलिंग काम पाहत आहेत.