स्वतंत्र जनगणना ओबीसीं विकासाचा मार्ग-प्रा.तायवाडे

0
15

ओबीसी महासभेतील प्रतिपादन
गडचिरोली दि.२१ : देशात ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाचा स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही विकास झाला नाही. ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी करून ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे. ओबीसींचा विकास होण्यासाठी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, त्याबरोबरच ओबीसींची स्वतंत्र जनगणना सरकारने करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी शनिवारी केले.
धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ते बोलत होते. २७ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ओबीसी महिलांचे महाअधिवेशन व ८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ओबीसी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने ओबीसींची महासभा आयोजित करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खा. खुशालचंद्र बोपचे, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजुरकर,प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे, बबनराव फंड,जिवन लंजे, प्रा. अनिल शिंदे, प्राचार्य खनके, अरूण मुनघाटे, देवेंद्र म्हशाखेत्री, दादाजी चापले, नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य के. वाय. वाघरे, एस. टी. विधाते, प्रा.संजय पन्नासे, प्रा. राजेश कातटड्ढवार, जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, नगराध्यक्ष अश्विनी यादव, पं. स. सभापती सविता भोयर, पं. स. सदस्य राजश्री मुनघाटे, नगरसेविका वर्षा चिमुरकर, दादाजी चुधरी, प्रभाकर वासेकर, लक्ष्मी मने, प्रशांत वाघरे, प्रा. शेषराव येलेकर, बाबुराव बावणे, रत्नदीप म्हशाखेत्री, पांडुरंग घोटेकर, रूचीत वांढरे, महेंद्र ब्राह्मणवाडे, नंदू खरवडे, लोकमान्य बरडे, राजू झरकर, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, नंदू वैरागडे, राजू मोहुर्ले, नाना पाल उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रा.तायवाडे म्हणाले की,छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये ओबीसी समाजाला ५० टक्के सत्तेत प्राधान्य दिले.१९५२ मध्ये ५२ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असतांना ते मिळण्यासाठी ४० वर्ष ओबीसंीना संघर्ष करावा लागला.मात्र अद्यापही ओबीसींची जनगणना झालेली नाही.गडचिरोली जिल्ह्यात लागू केलेल्या पेशा कायद्याला आमचा विरोध नाही,परंतु राज्यपालांनी काढलेल्या नोकरभरतीवरील अधिसुचनेला आमचा स्पष्ट नकार आहे ज्यामुळे आमच्या ओबीसी मुलांच्या नोकरी हिरावून घेतल्या गेल्या आहेत.                                                                                                                                                                                          img_20161119_150732

यावेळी बोलतांना माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी या देशातील प्रत्येक अधिकारी,कर्मचारी व आमदार खासदारांना राष्ट्रहितासाठी काम करीत असल्याचे सांगत सरकार पेंशन देते मात्र जो शेतकरी,शेतमजुर आपल्या शेतात राबून देशाच्या अन्नधान्याची गरज पुर्ण करते तो काय राष्ट्रहिताचे काम करीत नाही का अशा प्रतिप्रश्न उपस्थित करीत आजपर्यंतच्या सर्वंच सरकारने सर्वाधिक राष्ट्रहितासाठी राबणाèया शेतकरी शेतमजुराची पिळवणूक केल्याचे सांगत याना वयाच्या ६० वर्षानंतर पेंशन लागू करण्यात यावी ही आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची प्रमुख मागणी असल्याचेही ते म्हणाले.गावखेड्यातील शेतकरी हा ९० टक्के ओबीसी समाजाचा असल्याने आधी त्यांचा विकास होणे गरजेचे असून या देशात ५००० वर्षापासून आरक्षणाची परंपरा सुरु आहे,ती सुध्दा मनुच्या काळापासून ज्यांनी आरक्षण भोगले ते आज आमच्या आरक्षणाचा विरोध का करतात हे समजून घेण्याचीच नव्हे तर रस्त्यावर संघर्शासाठी लढण्याची वेळ असल्याचे डॉ.बोपचे म्हणाले.अनिल म्हशाखेत्री यांनी महिला अधिवेशनासाठी आपल्या शिक्षण संस्थेतील सर्व ओबीसी महिला कर्मचारी व सामाजिक कार्यकत्र्यांना पाठविण्याची व्यवस्था करुन देण्याची घोषणा केली.नगराध्यक्ष अश्विनी यादव यांनी महिलांनी आत्ता घरामध्ये न बसता आपल्या हक्कासाठी लढा देण्याची खरी गरज असल्याचे विचार व्यक्त केले.प्रतिभा चौधरी यांनी ओबीसीवर अन्याय करणाèया प्रत्येक लोकप्रतिनिधीला येत्या निवडणुकीत जाब विचारण्याची गरज असल्याचे सांगितले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे यांनी येत्या २७ च्या महिला महाधिवेशनाला महिलांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करीत ८ डिसेबरच्या महामोच्र्यात गडचिरोली जिल्ह्यातील कोरची,कुरखेडा,आरमोरी व वडसा देसाईगंज येथील ओबीसी बांधवानी रेल्वेने या मोच्र्यात सहभागी होण्यासाठी गावखेड्यापर्यंत प्रचार प्रसार करावे असे आवाहन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. ओबीसी समाजबांधव व महिलांनी २७ नोव्हेंबरच्या नागपूर येथील महाअधिवेशनात व ८ डिसेंबरच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.शेषराव येलेकर यांनी तर संचालन प्रा.मस्के यांनी केले.