विदर्भ दिंडी यात्रेचा शुभारंभ देवरीतून

0
11

देवरी दि.२३: येथून १ डिसेंबर रोजी विदर्भ दिंडीचा शुभारंभ सकाळी १० वाजता जिल्हा परिषद मैदानातून होणार आहे. या दिंडीचे नियोजन करण्यासंबंधात चर्चा करण्याकरिता येत्या शुक्रवारी (दि.२५) येथे भारतसिंह दुधनाग यांच्या निवासस्थानी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

यानिमित्त रविवारी (दि.२०) घेण्यात आलेल्या सभेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोर कमिटी सदस्य रामरतन राऊत हे होते. याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा कोर कमेटी सदस्य भरतसिंह दुधनाग, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, देवरी तालुका अध्यक्ष अ‍ॅड. भूषण मस्करे, सचिव अ‍ॅड. पुष्पकुमार गंगबोईर, देवरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुमन बिसेन, सदस्य संजयकुमार वडगाये, नंदुप्रसाद शर्मा, महेंद्र वैद्य, अश्विन मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

आयोजित या सभेत येत्या १ डिसेंबरपासून देवरीवरुन शुभारंभ होणाऱ्या विदर्भ दिंडी यात्रेबाबद योग्य नियोजन करण्याकरिता येत्या २५ नोव्हेंबर रोजी देवरी येथे भरतसिंह दुधनाग यांच्या निवासस्थानी एक विशेष सभेचे आयोजन करुन या संबंधात चर्चा करण्यात आली. तरी २५ नोव्हेंबर रोजी आयोजित सभेत जास्तीत-जास्त विदर्भ वासीयांनी उपस्थित राहून सभेच्या चर्चेत सहभाग घ्यावा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी या विदर्भ दिंडी यात्रेत परिसरातील जास्तीत-जास्त महिलांनी सहभाग घ्यावा याकरिता नगराध्यक्ष सुमन बिसेन यांची सर्वानुमते तालुका महिला समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. येत्या ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भ दिंडी यात्रेचा समारोप व विशाल मोर्चाचे आयोजन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. तरी शुक्रवारच्या (दि.२५) सभेत जास्तीत-जास्त विदर्भवासीयांनी उपस्थित राहून या चर्चेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे