25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण : रूग्णांची होतेय गैरसोय

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्थानांतरण : रूग्णांची होतेय गैरसोय

0
24

आमगाव दि.10 : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या व्हेन्टीलेटरवर आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांचे स्थानांतरण झाले. त्यांनी आपला पदभार कुणालाच दिला नाही. येथे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्याची खुर्ची रिकामी आहे. येथे त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी मुन्ना शर्मा यांनी केली आहे.

मागील अनेक महिन्यापासून बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेक राजकीय पक्षातील राजकारण्याच्या हस्तक्षेपामुळे कार्यरत कर्मचारी कुणाचे ऐकण्याच्या तयारीत नाहीत. काही कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे व मालसुतो अभियानामुळे कर्मचारी चर्चेत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांचा प्रशासन योग्य असला तरी प्रशासनाला खिळ घालण्याचा काम येथील चतुर्थ कर्मचारी करीत असल्याने त्यानाही येथे नकोसे झाले होते. त्यांनी आपले स्थानांतरण केले किंवा प्रशासकीय झाले यावर चर्चा न करता खाली असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती त्वरित करण्याची मागणी होत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या नगरात प्राथमिक आरोग्य अधिकारी नसल्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडत आहे. रुग्ण कल्याण समिती सदस्याला सुद्धा कुणी कर्मचारी जुमानत नाही, असा आरोप मुन्ना शर्मा यांनी केला आहे.

blank