गडचिरोली ओबीसी संघटनेने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
12

गडचिरोली,दि.15- गडचिरोली जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिका-यांन मार्फत आज गुरुवारला दिवेनदन देउन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने काढण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षकाच्या भरतीमध्ये ओबीसीवर करण्यात आलेल्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यात आला.
महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्यावतीने ६ डिसेंबरला काढण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये ओबीसी प्रर्वगरसाठी एकही जागा आरक्षित न करता खुल्या प्रर्वगासाठी ७५ टक्के जागा आरक्षित करून ओबीसी समाजावर केलेल्या अन्यायाच्या विरोधात राष्टÑीय ओबीयी महासंघ व गडचिरोली ओबीसी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे.सदर मागणीचे निवेदन गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेेवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा.शेषराव येलेकर येलेकर,गडचिरोली जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अरुण मुनघाटे ,रुचित घनश्याम वांढरे आणि आमचे विद्यार्थी संघटना प्रीतम ठाकरे ,चेतन शेंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.