ओबीसी सेवा संघाने नोंदविला शासनाचा निषेध

0
7

भंडारा,दि.15-गेल्या दोन अडीच वर्षापासून केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारने ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय करण्याचा सपाटा सुरु केला असून ओबीसींची जनगणनाही अडविली.त्यातच नोकरभरतीमधील ओबीसीच्या आरक्षणालाही संपविण्याचा डाव रचल्याचे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 750 पोलीस उपनिरिक्षकाच्या जागेसाठी काढलेल्या जाहिरातीवरुन दिसून येत असल्याने भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ या प्रकाराचा निषेध नोंदवित असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.सोबतच आमच्या जिल्ह्यातील ओबीसी आमदार खासदार हे फक्त गप्पा मारण्यासाठी व ओबीसीच्या नावावर मते मागण्यासाठीच नौटंकी करीत असल्याने त्यांच्या भूमिकेवरही टिका केली आहे.गोंदिया जिल्हा परिषदेच्या एनआरएचएमच्या जाहिरातीमध्ये सुध्दा ओबीसी समाजाला डावलण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर,दयाराम आकरे,दामोदर क्षिरसागर,अनिता बोरकर,वर्षा आगाशे,वाहिद शेख,राजिया शेख,मंजुषा बुरडे ,संगीता धांडे,अर्जुन सुर्यंवशी,सुधाकर भोयर,डाॅ.महादेव महाजन आदी उपस्थित होते.