गोंदियाच्या विकासासाठी भाजपला निवडून द्या-मुख्यमंत्री

0
18

गोंदिया,दि.06:-पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील जिल्हास्थळे अतिशय मागे असून आता विदर्भाचा पुत्र राज्याचा मुख्यमंत्री असल्याने विदर्भातील प्रत्येक जिल्हास्थळाला सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. गत ५० वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादीने शहरीकरणाच्या नावावर जतनेला फसविले. परंतु भाजपाची सत्ता येताच ३०० पैकी १०० शहरे गोदरीमुक्त करून विकासाच्या प्रवाहात आणली. वर्तमान गोंदियाची परिस्थिती अत्यंत बिकट असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. त्यामुळे विकसीत गोंदियासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते आज, ६ जानेवारी रोजी गोंदियाच्या कोतवाल ग्राऊंडवर नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार अशोक इंगळे व अन्य २१ प्रभागातील ४२ उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री ना. राजकुमार बडोले, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले,  विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, आमदार संजय पुराम, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. केशवराव मानकर, भेरqसग नागपूरे, खोमेश रहांगडाले, दयाराम कापगते, विदर्भाचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.च्या उपाध्यक्षा रचना गहाणे,विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, रविकांत बोपचे भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, पंकज रहांगडाले यांच्यासह सर्व २१ प्रभागाचे ४२ उमेदवार, शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र व राज्यात जनेतेने सत्ता परिवर्तन करून भाजपाला सत्ता सोपविली. तेव्हापासून विकासकामांचा रथ हा वेगाने निघाला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे असून गरीबांचे जनतेचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत शहरीकरणाच्या माध्यमातून लोककल्याण साधणे यासाठी आमची धडपड आहे. केंद्र आणि शासनाच्या माध्यमातून लोकांसाठी राबविल्या जाणाèया विविध कल्याणकारी योजना याचे सूचक आहेत. केंद्रात व महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भाजपाचे राज्य मतदारांनी दिले. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला कुठलाही भेदभाव न करता होत आहे. मुद्रा योजना, गोदरीमुक्त योजना, प्रधानमंत्री सडक योजना यांचा फायदा लोकांना होत आहेच, पण सर्वसामान्य जनतेसाठी विमा योजना, गॅस कनेक्शन योजना यासारख्या योजनाही लागू करण्यात आल्या आहेत. पूर्वी ८० टक्के नागरिक ग्रामीण भागात राहत होते. परंतु २०११ च्या जनगणनेनुसार ५० टक्के शहरीकरण झाले आहे. या शहरीकरणामुळे प्रचंड प्रदूषण वाढले असून जीवनावश्यक वस्तूंची सोयी संपल्या आहेत. सध्या शासनाने शहरातील लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व रोजगार पुरविण्याची योजना आखली आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांच्या समस्यांप्रती सजग आहे. गोंदिया नगरपालिकेतही भाजपाला संधी देऊन विकास दारापर्यंत आणण्यासाठी स्वतःच कारणीभूत ठरावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी सभेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,  माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, भेरqसग नागपूरे, सीता रहांगडाले यांनीही मार्गदर्शन केले.
काँग्रेसच्या नेत्यासंह इतरांनी केला पक्षप्रवेश
याप्रसंगी काँग्रेसचे सुरेश चौरागडे, नगरसेविका अनिता दारा बैरीसाल, योगेश जायस्वाल, अ‍ॅड. अनंत दिक्षीत, मुन्ना भारद्वाज, सुरेश गुरव, विजेंद्र जैन, रवी हलमारे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुधीर कायरकर यांनी अनेक कार्यकत्र्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.

पत्रकारांच्या जागेवर इतरांचा कब्जा,भाजपचे नगरपरिषद प्रभारी अग्रवाल म्हणाले मी काय करु
मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहिर सभा असल्याने प्रसिध्दीमाध्यमांच्या लोकासांठी बसण्याची सोय सुध्दा करण्यात आली होती.परंतु प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा प्रचारसभेचे वृत्ताकंन करण्यासाठी गेले तेव्हा मात्र पत्रकारांच्या जागेवर ज्यांच्या पत्रकारेतीशी काळीचाही संबध नव्हता असे काही शहरातील स्वयघोषित मान्यवर विराजमान झाली होती.आणि पत्रकार मात्र उभे होते,तेव्हा पत्रकारांच्या जागेवर इतर नेते बसले असून पत्रकारांना बसण्याची सोय करण्यासंबंधी नगरपरिषद निवडणुक प्रभारी विनोद अग्रवाल यांना एका पत्रकार प्रतिनिधींने फोन केला असता अग्रवाल यांनी मात्र मी काय करुन त्यांना कसे उठवू ते नगरपरिषदेचे मतदार असतील वाद होईल असे म्हणत बाजू झटकली.यावरुन पत्रकार हे गोंदियातील मतदार नाहीत का अशा एक प्रश्न उपस्थित झाला तर दुसरे पत्रकारांच्या जागेवर जे बसले होते ते पत्रकार होते काय हा सुध्दा संशोधनचा विषय ठरला.त्या जागेवर कोण बसले याचा शोध घेतला असता विश्व हिंदू परिषद आणि काही महिला समाज संघटनेचे पदाधिकारी म्हणविणारे लोक बसले होते हे दिसून आले.तर अग्रवाल यांना याबाबत विचारण केल्यावर मी असे काही बोललो नसल्याचे त्यांचे म्हणने आहे.