पोषण पुर्नवसन केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम

0
11

भंडारा,दि.07 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात पोषण पुर्नवसन केंद्रातील कुपोषित बालकांसाठी वार्ड तयार करण्यात आला आहे. या पोषण पुर्नवसन केंद्राला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते यांच्या हस्ते दिप प्रल्वलन करुन झाले.

यावेळी डॉ. धकाते यांनी कुपोषणाचे कारणे, कुपोषण टाळण्यासाठी उपाययोजना व नियंत्रण, स्वच्छतेचे महत्व, लहान बालकांची आहाराबाबत काळजी घेणे तसेच वेळोवेळी लसीकरण करण्याबाबत माहिती दिली. जेव्हा जास्तीत जास्त लाभार्थी या केंद्राचा लाभ घेवून आपला समाज कुपोषण मुक्त कसा होईल यासाठी पोषण पुर्नवसन केंद्रात उपचार घेतलेल्या कुपोषित बालकांच्या मातांनी गावातील इतर बालकांच्या परिवारास ही माहिती देवून समाज कुपोषण मुक्त करण्यास सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्क डॉ. सुनिता बढे, डॉ. पियुष गोयल, डॉ. सुचिता वाघमारे, डॉ. पराग डहाके उपस्थित होते.