नोटबंदी विरोधात काँग्रेसने रोखला महामार्ग

0
8

भंडारा दि. 8 : केंद्र सरकारने चलनातून अचानक ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्या. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने भाजीपालाधार्जनीचे उत्पादन कवडीमोल भावात विकावे लागत आहे. यात काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आज भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून महामार्ग मोकळा केला. दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या १३० कार्यकर्त्यांना अटकेची कारवाई केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तैसर अहमद, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांच्या नेतृत्त्वात जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, जि.प. सभापती नीळकंठ टेकाम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सिमा भुरे, प्रमोद तितीरमारे, धनराज साठवणे यांच्या मार्गदर्शनात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आला.