जि.प.दत्तक ग्राम योजनेची झाली गावे निश्चित

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया: जिल्हा परिषदेने गाजावाजा करुन घोषणा केलेल्या जिल्हा परिषद सदस्य दत्तक ग्राम योजनेच्या गावांची आता कुठे निश्चिती झाली आहे.स्पष्ठ,पारदशक गतीशील प्रशासनाचे कामकाज मात्र चांगलेच वरिष्ठांच्या मागर्दशर्नात उशीरा चालले आणि मुदत संपल्यानंतर विविध वृत्तपत्रांनी त्यावर आपली नजर असल्याचे दाखविल्यानंतर नाव न देणाया सदस्यांनाही जाग आली आणि दत्तक ग्राम योजनेच्या यादीला अंतीम रुप मिळाले. जिल्हा परिषद सदस्यांच्या अनास्थेमुळे पंचायत विभागातील संपुणर्ला स्वच्छता विभागाला ही यादी पूर्ण करण्यास उशिर झाल्याचे या विभागातील सयोजकांचे म्हणने आहे.पहिले गाव दत्तक घेणारे एकमेव जिल्हा परिषदेचे अध्यक्षच होते.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व ५२ जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी आपल्या क्षेत्रातील निवड केलेल्या गावांचे नाव पंचायत विभागाकडे द्यायचे होते. मात्र या उपक्रमाप्रती जिल्हा परिषद सदस्यांची अनास्था अगोदरपासूनच दिसून येत होती. त्यामुळेच दिलेल्या मुदतीत अर्ध्यापेक्षाही कमी सदस्यांच्या गावांची नावे पंचायत विभागाकडे आली होती.

या यादीनुसार,चिखलीचे सदस्य जागेश्वर धनभाते यांनी चिखली तर गोरेगाव तालुक्यातील गणखैराचे सदस्य मोरेश्वर कटरे यांनी सटवा, सोनीच्या सदस्य सिता रहांगडाले यांनी सिलेगाव, गिधाडीचे सदस्य विनोद अग्रवाल यांनी गिधाडी, गोरेगावच्या सदस्य बबीता टेंभुर्णीकर यांनी घोटी, कुऱ्हाडीचे सदस्य रामकिशोर राऊत यांनी बोळुंदा तसेच मोहाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कूसन घासले यांनी तेढा, गोंदिया तालुक्यातील काटी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य नरेंद्र तुरकर यांनी कासा या गावाची निवड केली आहे. तर गर्रा खुर्द क्षेत्राच्या सदस्य उषा बरडे यांनी बनाथर, कामठा क्षेत्राचे सदस्य कुंदन कटारे यांनी छिपिया, सावरीचे सदस्य नेतराम कटरे यांनी अंभोरा, नागराचे सदस्य रमेश लिल्हारे यांनी लहीटोला, दासगाव खुर्दचे सदस्य रूद्रसेन खांडेकर यांनी किन्ही, दवनीवाडाचे सदस्य अर्जुन नागपुरे यांनी महालगाव, एकोडीच्या सदस्य मिना सोयाम यांनी पारडीबांध, डोंगरगावचे सदस्य मुनेंद्र नांदगाये यांनी चुटीया, कुडवाचे सदस्य बाळकृष्ण पटले यांनी कुडवा, खमारीचे सदस्य जगदीश बहेकार यांनी तुमखेडा खु., फुलचूरचे सदस्य राजेश चतूर यांनी ढाकणी; तिरोडा तालुक्यातील अर्जुनीचे सदस्य डॉ. योगेंद्र भगत यांनी बाघोली, सेजगावचे सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी बेरडीपार, कवलेवाडाच्या सदस्य तेजेश्वरी भोंगाडे यांनी भंबोडी, सरांडीचे सदस्य पंचम बिसेन यांनी गांगला, वडेगावचे सदस्य विष्णू बिंझाडे यांनी कोयलारी, सुकडीचे सदस्य मदन पटले यांनी पिंकडेपार; आमगाव तालुक्यातील किकरीपारच्या सदस्य उषा हर्षे यांनी कालीमाटी, आमगावचे सदस्य विजय शिवणकर यांनी रिसामा, गोरठाच्या सदस्य योगेश्वरी पटले यांनी बुराडीटोला, ठाणाचे सदस्य टुंडीलाल कटरे यांनी बोथली, पदमपूरचे सदस्य रमेश बहेकार यांनी किडंगीपार, घाटटेमनीच्या सदस्य संगीता दोनोडे यांनी सितेपार; सालेकसा तालुक्यातील सालेकसा (झालीया)च्या सदस्य देवकी नागपुरे यांनी बाम्हणी, पिपरीयाच्या सदस्य प्रेमलता दमाहे यांनी पिपरीया, आमगाव खुर्दच्या सदस्य कल्याणी कटरे यांनी धानोली, कारूटोलाचे सदस्य श्रावण राणा यांनी कारूटोला; देवरी तालुक्यातील पुराडाच्या सदस्य सविता पुराम यांनी ओवारा, गोटाबोडीचे सदस्य राजेश चांदेवार यांनी मुरदोली, देवरीच्या सदस्य पार्वता चांदेवार यांनी शिरपुरबांध, ककोडीचे सदस्य संदीप भाटीया यांनी केशोरी, चिचगडचे सदस्य तुळशीराम गहाणे यांनी पिपरखारी; अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधचे सदस्य मधूकर मसरकोल्हे यांनी सिरेगावबांध, गोठणगावच्या सदस्य मिना राऊत यांनी झाशीनगर, बोंडगावदेवीचे सदस्य अरविंद शिवणकर यांनी पिंपळगाव, अर्जुनी मोरगावच्या सदस्य सुरेखा नाईक यांनी कुंभीटोला, महागावच्या सदस्य किरण कांबळे यांनी बुटाई क्रमांक २, केशोरी चे सदस्य प्रकाश गहाणे यांनी वारवी, ईटखेडाचे सदस्य उमाकांत ढेंगे यांनी ईटखेडा; सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरीचे सदस्य चंद्रकांत मरसकोल्हे यांनी मुरपार/ले., डव्वाच्या सदस्य किरण गावराने यांनी डव्वा, सौंदडच्या सदस्य रूपाली टेंभूर्णे यांनी गिरोला, सडक अर्जुनीचे सदस्य मिलन राऊत यांनी दल्ली गाव दत्तक घेतले.