अग्निसुरक्षा प्रशिक्षण व रंगीत तालीम

0
9

गोंदिया,दि.१८ : आपत्तीच्या वेळी नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी तसचे अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने माहिती प्रशिक्षण व त्याचे प्रात्यक्षिकातून त्याचे महत्व पटवून देण्यासाठी आज १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नियोजन समितीच्या सभागृहात अग्निसुरक्षा या विषयावर माहिती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ डिसेंबर रोजी गोदिया शहरातील मुख्य बाजारपेठेतून गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदल प्लाझा येथे आग लागून ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशाप्रकारच्या घटना पुढे होऊ नयेत म्हणून नागरिकांना आत्मसंरक्षाणासाठी अग्निसुरक्षा या विषयावर माहिती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे मार्गदर्शन करणार असून अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे श्री त्रिलोकसिंग हे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात आपत्तीच्या वेळेस करण्यात येणाऱ्या उपाययोजना, आत्मसंरक्षण, शोध व बचाव, माहिती व प्रशिक्षण तसेच रंगीत तालीमचे प्रशिक्षण सुध्दा देण्यात येणार आहे. रंगीत तालीम दुपारी ३.३० वाजता मनोहर मुन्सीपल हायस्कूलच्या बाजूला हॉटेल रॅम्बो येथे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.