नवनीत कौर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ? पदवीधर मतदारसंघात भाजपला समर्थन

0
7

अमरावती दि. 23 – अमरावती या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नवनीत कौर राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अर्थात भाजपसोबत जवळीक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात चमकल्या नाही. आता पदवीधर निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याचे ठरविले आहे. मात्र राष्ट्रवादीला सोडले असल्याचेही अधिकृत जाहीर केले नाही.एका वृत्तवाहिनीशी बोलतानी नवनीत राणा यांनी आगामी पदवीधर निवडणुकीत भाजपसोबत असल्याचे सांगितले.महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे नवनीत कौर यांनी सांगितले.त्या म्हणाल्या, ‘रवी राणा दुसऱ्यांदा स्वबळावर आमदार झाले आहे, ते त्यांच्या कामामुळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा मतदारसंघासाठी मोठा निधी दिला आहे.आम्ही जनतेसाठी काम करतो. कोणत्याही पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी काम करीत नाही.अमरावतीचा महापौर ‘वाय.एस.बी’चाच होईल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे का या प्रश्नाचे नवनीत राणा यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.