१३ फेब्रुवारीला गोेंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ

0
20

गडचिरोली,दि.23 : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा चतुर्थ दीक्षांत समारंभ येत्या १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११. ३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. एन.व्ही. कल्याणकर राहणार असून संगणक तज्ञ पद्मभुषण डाॅ. विजय भटकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या समारंभाला मेघालयचे माजी राज्यपाल व निवृत्त सनदी अधिकारी रणजित मुशाहरी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आज गोंडवाना विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
दीक्षांत समारंभात गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी २०१५ व उन्हाळी २०१६ या परीक्षेतील पदवी व पदव्युत्तर पदविका परीक्षेत उत्तीर्ण १२ हजार ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. उन्हाळी २०१६ च्या परीक्षेत विद्यापीठ निर्देश क्रमांक १६७ / २०१३ नुसार २५३ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि २४ सुवर्णपदकांचे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभाला विद्यापीठाद्वारे प्रथमच साधारणतः १० विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित केले जाणार आहे.
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी
एम.ए. इंग्रजी – संध्या देवराव खेवले: चंद्रपूर भुषण शांताराम पोटदुखे सुवर्णपदक, विठोबाजी शेंडे सुवर्णपदक
एम.ए. मराठी – सर्वाधिक गुण: अस्मिता दिलीप कोथेवार – गोविंदराव मुनघाटे सुवर्णपदक
एम. ए. हिंदी – श्यामप्रिया नामदेव मडावी: स्व.डाॅ. मथुराप्रसाद दुबे कुलदीप स्मृती सुवर्णपदक
एम. ए. पाली – दीक्षा विठ्ठल गायकवाड: सुभद्रा धनवंत खोब्रागडे सुवर्णपदक
बि. काॅम , सर्वाधिक गुण – प्रतिक्षा दिलीप कामडे: स्व. शेषराव लक्ष्मणराव जगनाडे स्मृती सुवर्णपदक, स्व. रामचंद्र चक्करवार स्मृती सुवर्णपदक, स्व. श्री रामचंद्र जयराम मामीडवार व स्व. श्रीमती सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार स्मृती सुवर्णपदक
एम.बी.ए. अभ्यासक्रम सर्वाधिक गुण – मोनाली भैय्यालाल तामगडे: सांबाशिव आईंचवार सुवर्णपदक, राजीव मधुकरराव तातावार सुवर्णपदक
एल.एल.बी. – अंकीत शरदकुमार गुप्ता: स्व. अॅड. ताराचंद खजांची शताब्दी स्मृती सुवर्णपदक, चंद्रपूर भुषण शांतारामजी पोटदुखे सुवर्णपदक
एम.एसस्सी सर्वाधिक गुण – ज्योती हरिश्चंद्र झुरे: स्व. डाॅ. वैभव वसंतराव दोंतुलवार सुवर्णपदक
एम. ए. राज्यशास्त्र सर्वाधिक गुण – सविता धर्मराव बन्सोड: स्व. वसंतराव दोंतुलवार स्मृत सुवर्णपदक जाहिर करण्यात आले आहे.
विषयांमध्ये सर्वाधिक गुण घेवून प्रथम येणारे विद्यार्थी
बि.ए. हिंदी वाडःमय – प्रियंका भोरेलाल करूनाकर: सुशिलादेवी राजेंद्र दिक्षीत सुवर्णपदक
बि.ए. भुगोल – कोमल दिलीप धनके: स्व. प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे स्मृती सुवर्णपदक
बि.ए. राज्यशास्त्र – सिमा अंबादास कोसे: स्व. प्रभाकर कृष्णराव सुपले स्मृती सुवर्णपदक
बि.ए. मानसशास्त्र – प्रियंका मंगलदास वंजारी: स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व. गणपतराव आर. मोगरे स्मृती सुवर्णपदक
बि.ए. संगीत – शेख नुरसाभाबानो इस्लामुद्दीन: श्रीमती अंजनाबाई गणपतराव मोगरे सुवर्णपदक
बि.ए. आंबेडकर विचारधारा – जनार्धन शंकर पेरगुवार: स्व. भुमिका देविदास गणविर स्मृती सुवर्णपदक
एल.एल.बी. काॅन्स्टिट्युशन लाॅ – अंकीत शरदकुमार गुप्ता: स्व. टी.के. अयप्पन पिल्लई स्मृती पुरस्कार
एल.एल.बी. हिंदू लाॅ – रिया मुकेश जैन: स्व. डाॅ. दत्तात्रय माधवराव मुन्शी सुवर्णपदक
आदिवासी विद्यार्थ्यांमधून प्रथम येणारे विद्यार्थी
एम.ए. मराठी – दिगांबर श्रीहरी शेंडे: गोंडवन गौरव शांताराम पोटदुखे सुवर्णपदक
बि.एसस्सी- तृप्ती श्रीकृष्ण श्रीरामे: कै. बापुजी मामुलवार पाटील स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.
आचार्य पदवीधारकांची अधिसुचना विद्यापीठाने निर्गमित केली असून ५ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीची घोषणा केली आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा काही विद्याथ्र्यांना आचार्य पदवी घोषित केल्या जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दीक्षांत समारंभाला महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, सचिव, दानदात्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिवांनी केले आहे.