सभापतिपदी राऊत, मल्लानी, टेंभुर्णे, डोये, मुंगुलमारे

0
10

साकोली दि.२५: नगरपरिषद साकोलीच्या पाचही विषय समितीची मंगळवारला साकोली नगरपरिषद कार्यालय उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, साकोलीचे तहसीलदार खडतकर व प्रशासकीय अधिकारी परमार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लानी व नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत विषय समितीची निवड करण्यात आली.
यात स्थायी समितीच्या सभापतीपदी धनवंता राऊत तर सदस्यपदी तरुण मल्लानी, वनिता डोये, नालंदा टेंभुर्णे, रोहिणी मुंगुलमारे यांचे निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी तरुण मल्लानी, सदस्यपदी जगन उईके, रविंद्र परशुरामकर, पुरुषोत्तम कोटांगले, शैलेश शहारे यांची वर्णी लागली आहे.
स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी नालंदा टेंभुर्णे, सदस्यपदी जगन उईके, अनिता पोगडे, शैलूताई बोरकर, भोजेंद्र गहाणे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी वनिता डोेये, सदस्यपदी अनिता पोगडे, लता कापगते, सुभाष बागडे, अ‍ॅड.मनिषा कापगते, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रोहिणी मुंगुलमारे तर सदस्यपदी मिना लांजेवार, गीता बडोले व राजश्री मुंगुलमारे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.साकोलीची नगर परिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आली असून या समित्या स्थापनेनंतर निवडीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता नगर परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.