भाजपने जाहीर केली पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी

0
18
Exif_JPEG_420

गडचिरोली, दि.२: येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटाच्या ३५ व पंचायत समिती गणाच्या ७० अधिकृत उमेदवारांची नावे भारतीय जनता पक्षाने आज नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर जाहीर केली. मात्र, पक्षाकडे तिकिट मागणाऱ्या तीन विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली आहे.भाजपने यावेळी मागच्या वेळी चामोर्शी तालुक्यातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविलेले डॉ.तामदेव दुधबळे, सौ. संध्या तामदेव दुधबळे व वर्षा कौशिक या तीन विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना तिकिट नाकारले आहे. हे तिघेही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. शिवाय भाजपच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम यांनाही भाजपने तिकिट दिलेले नाही.
भाजपचे जिल्हाध्यक्ष व खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, जिल्हा सचिव डॉ.भारत खटी, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक रमेश भुरसे, रेखा डोळस, सुधाकर येनगंधलवार, विलास भांडेकर उपस्थित होते. खा.अशोक नेते म्हणाले यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला इच्छूक उमेदवारांची नावे मागितली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन व नामांकित कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांमुळे जिल्हा परिषदेत भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेत किमान ४० जागांवर भाजप विजयी होईल, असे भाजपतर्फे संबंधित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आल्याचा दावाही खा.नेते यांनी केला. जे लोक पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करतील, त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खा.नेते यांनी आज प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, कोरची तालुक्यातील कोटरा-बिहिटेकला जिल्हा परिषद क्षेत्रातून विनोदकुमार भारत पोरेटी यांना तिकिट देण्यात आले आहे. अन्य जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे- बेळगाव-कोटगूल- कुंदा नमोदय गायकवाड, पलसगड-पुराडा-प्रकाश कोकोडे, वडेगाव-तळेगाव-नाजुकराव पुराम, गेवर्धा-गोठणगाव-विजय भैसारे, कढोली-सावलखेडा-भाग्यवान टेकाम, अंगारा-येंगलखेडा-गीता सुनील कुमरे, कोरेगाव-डोंगरगाव-रमाकांत ठेंगरी, विसोरा-सावंगी-कोदंडधारी नाकाडे, कुरुड-कोकडी-रोशनी पारधी, मानापूर-वैरागड-संपत आडे, पळसगाव-अरसोडा-सविता दर्वे, ठाणेगाव-इंजेवारी-मितलेश्वरी खोब्रागडे, सिर्सी-वडधा-गीता कंगाले, मुस्का-मुरुमगाव-लता पुंघाटे, येरकड-रांगी-प्रकाश काटेंगे, चातगाव-कारवाफा-शशिकांत साळवे, पेंढरी-गट्टा-अरुण हरडे, मौशीखांब-मुरमाडी-नीता साखरे, वसा-पोर्ला- प्रशांत वाघरे, कोटगल-मुरखळा-ममता दुधबावरे, जेप्रा-विहीरगाव-दिवाकर बारसागडे, मुडझा-येवली-रेखा डोळस, कुनघाडा-तळोधी-रमेश बारसागडे, विसापूर-कुरुड-योगीता भांडेकर, विक्रमपूर-फराडा-विद्या आभारे, भेंडाळा-मुरखळा-रेखा चुधरी, लखमापूर बोरी-गणपूर रै- स्वप्नील वरघंटे, हळदवाही-रेगडी-मीना कोडाप, घोट-सुभाषग्राम-नामदेव सोनटक्के, दुर्गापूर-वायगाव- शिल्पा धर्मराज रॉय, आष्टी-इल्लूर-अंजली रवींद्र ओल्लालवार, कालीनगर-विवेकानंदपूर-रवींद्र ओल्लालवार, सुंदरनगर-गोमणी-संतोष सरदार, कोठारी-शांतीग्राम-माधुरी उरेते यांचा समावेश आहे. यावेळी पंचायत समिती गणाच्या उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली.