29.9 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ खैरबोडी सेवा सहकारी संस्थेवर रहांगडाले पॅनल विजयी

खैरबोडी सेवा सहकारी संस्थेवर रहांगडाले पॅनल विजयी

0
21

तिरोडा दि.८-: तालुक्यातील खैरबोडी सेवा सहकारी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक व माजी सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले व माजी सभापती वाय. टी. कटरे यांच्या पॅनलमध्ये झालेल्या सरळ लढतीत रहांगडाले पॅनल विजयी झाली. डॉ. चिंतामण रहांगडाले यांच्या शेतकरी पॅनलचे सर्वच उमेदवार डॉ. चिंतामण रहांगडाले, सुभाष मिश्रा, घनश्याम टेंभरे, मारोती पटले, नकटू राऊत, टॉपचंद टेंभरे, गीताबाई पारधी, भुमेश्‍वरी पारधी, जीवनलाल सोनवाने, जगदीश परतेती, हेमराज रहांगडाले, लक्ष्मीचंद टेंभरे विजयी झाले. विजयी झालेल्या सर्व मतदारांचे डॉ. चिंतामण रहांगडाले यांनी अभिनंदन केले.