डॉ. भुस्कुटे यांचा सत्कार

0
7

आमगाव दि.८: शिक्षण महर्षी श्रद्धेय मानकर गुरुजी जयंती महोत्सवाच्या पावन प्रसंगी भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम भुस्कुटे यांचा त्यांनी केलेल्या महाविद्यालयाच्या दैदीप्यमान विकासाबाबत भवभूती रिसर्च अँकॅडमी आमगावचे अध्यक्ष प्राचार्य ओ.सी.पटले व या संस्थेचे उपाध्यक्ष संतोष पुडकर यांच्याकडून जाहीर सत्कार करण्यात आला.
डॉ. भुस्कुटे हे उदात्त भावनेने महाविद्यालयातून उत्कृष्ट नागरिक घडावे यासाठी मागील बारा वर्षापासून सर्मपण वृत्तीने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. महाविद्यालयाची सुसज्ज इमारत, दज्रेदार शिक्षण, समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, मनोहारी उद्यान, भव्य क्रीडा संकुल, विशाल पटांगण, वर्षभर राबविले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम, विविध स्तरावरील स्पध्रेत महाविद्यालयाचा सहभाग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन यूजीसी नवी दिल्लीद्वारे नियुक्ती नॅक कमिटी बंगलोरकडून या महाविद्यालयाला ‘अ-श्रेणी’ प्राप्त झालेली आहे. नागपूर व गोंडवाना विद्यापीठांतर्गत समस्त ग्रामीण क्षेत्रातील महाविद्यालयात ‘अ-श्रेणी’ प्राप्त असे एकमेव महाविद्यालय आहे. प्राचार्य भुस्कुटे यांना ‘डायनामिक पर्सनॅलिटी अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी मंचावर भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार केशवभाऊ मानकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी व अन्य मान्यवर उपस्थित होते.