शक्ती संघटनेतर्फे अँकॅडमी एक्सलेन्स पुरस्काराची घोषणा

0
16

गोरेगाव दि. 11 : युवा शक्ती क्लब शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. उपक्रमांतर्गत २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात गोरेगाव शहरातून दहावी व बारावीमध्ये प्रथम व व्दितीय येणार्‍या विद्यार्थ्यांना अँकॅडमी एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार, असे क्लबतर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वर्ग पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना वर्गात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना देखील पदक व प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती युवा शक्ती क्लबचे तथा न.पं.चे उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी दिली आहे.
स्थानिक शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे युवा शक्ती स्पोर्ट क्लबतर्फे नुकतेच कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात युवा शक्ती क्लबचे तथा न.प.चे उपाध्यक्ष आशिष बारेवार, प्राचार्य एम.पी.शेख आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये हिरहिरी निर्माण व्हावी, या उद्देशाने युवा शक्ती क्लबच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळांनाही वॉटर फिल्टर तसेच कचाराकुंड्या उपलब्ध करून देण्याचेही आश्‍वासन देण्यात आले. यावेळी संजय घासले, अमित दहीवले, मयूर कोरेकर, यासीन शेख, आशिष बारेवार, अश्‍विन रूखमोडे, नमन जैन, भानू हरिणखेडे आदी उपस्थित होते.