26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ शांती स्तूपाचा वर्धापन दिन 15 फेब्रुवारीला

शांती स्तूपाचा वर्धापन दिन 15 फेब्रुवारीला

0
26

वर्धा,दि. 13 –विदर्भात वर्धा येथे असलेल्या प्रसिद्ध विश्वशांती स्तूपाचा 24 वा वर्धापन दिन न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जपानचे पूज्य योधा गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. आठ प्रमुख बौद्ध धम्मगुरूंच्या उपस्थितीत विशेष बुद्धपूजा, सुत्तपाठ आणि सर्वधर्मसमभाव प्रार्थना सभेचे आयोजन सकाळी 10.30 ते 12.30 वाजता होणार आहे असे ‘फुजीई गुरुजी मेमोरियल ट्रस्टचे कार्यकारी सचिव अशोक मेहरे यांनी कळविले आहे.