प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे गौरवग्रंथ ‘वसा विदर्भाचा’ उद्या लोकार्पण सोहळा

0
26

नागपूर,दि.१३-डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा वसा घेऊन शिक्षणक्षेत्रात वाटचाल करणारे माननीय प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या षष्टयब्दीपूर्ती निमित्त त्यांच्या गौरवार्थ ‘वसा विदर्भाचाङ्क या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. गेली तीन दशके विदर्भात आपल्या विविध क्षेत्रातील कार्याचा ठसा उमटविणाèया त्यांच्या वाटचालीचा आलेख उलगडणाèया मुलाखती आणि डॉ. तायवाडे यांच्या कार्याचा आढावा घेणारे लेख असलेल्या प्रस्तुत ग्रंथाचे संपादन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या संपादक मंडळाने केले आहे.या ग्रंथाचे लोकार्पण थोर तत्वचिंतक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आणि माजी कुलगुरू डॉ. हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सायकांळी ५ वाजता धनवटे नॅशनल कॉलेजच्या बास्केटबॉल ग्राऊंड काँग्रेसनगर,नागपूर येथे आयोजित केला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम आणि महाराष्ट्र टाईम्सचे कार्यकारी संपादक श्रीपाद अपराजित, अनंतराव घारड, आमदार सुनील केदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या ‘वसा विदर्भाचाङ्क : प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे गौरवग्रंथात लेखन सहयोग केलेल्या मान्यवरामध्ये प्राचार्य डॉ. या. वा. वडस्कर,प्राचार्य डॉ. हरिभाऊ केदार,डॉ. यशवंत मनोहर, विलास मुत्तेमवार,प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. श्रीनिवास खांदेवाले,प्रा. मनोहर सप्रे ,डॉ. सीमा साखरे,डॉ. रूपा कुलकर्णी,एड. एकनाथराव साळवे,उमेश चौबे,डॉ. गिरीश गांधी,नागेश चौधरी,चंद्रकांत वानखडे,प्रभाकरराव वैद्य,डॉ. मधुकर वाकोडे,डॉ. विठ्ठल वाघ,बाबाराव मुसळे,प्रा. किशोर सानप,प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके,प्राचार्य सदानंद बोरकर,मनोहर म्हैसाळकर,कुलगुरू डॉ. अरुण सातपुतळे,सीताराम भोतमांगे,डॉ. अशोक गोमासे,प्राचार्य भाऊसाहेब जगनाडे,भरत मेघे,प्रा. किरण नेरकर,प्राचार्य डॉ. एन. आर. दीक्षित,श्री. मिर्झापुरे,अनिल अहिरकर,प्रा. मोरेश्वर देशमुख,प्रदीप विटाळकर,डॉ. रत्नाकर भेलकर,राम घोडे,बबन नाखले,अरुणा सबाने,श्रीमती डी. सविता,सुरेश भुसारी,मनोज मोहिते,अविनाश दुधे,तीर्थराज कापगते ,अविनाश महालक्ष्मे,डॉ. हेमंत खडके,प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे,डॉ. राजेंद्र वाटाणे,डॉ. कोमल ठाकरे,रावसाहेब काळे,प्रा. प्रणव कोलते,गणेश मालटे,डॉ. राजेंद्र मुंढे व महेश जोगी यांचा समावेश आहे.या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे मित्रमंडळ,प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे गौरवग्रंथ संपादन समितीने केला आहे.