सरपंच मेळ्याव्यात काळ्याफिती लावून ग्रामसेवकांचा सहभाग

0
9

गोंदिया,दि.१३-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने आयोजित सरपंच मेळाव्याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना काळ्या फिती लावून आपला सहभाग नोंदविला.पंचायत विभागाचे उपमुकाअ राजेश बागडे यांच्याविरुध्द ग्रामसेवक संघटनेने आंदोलन पुकारले असून बागडे यांना हटविण्याच्या मागणीवर ग्रामसेवक संघटना अडून बसली आहे.या आंदोलनाचा फटका प्रशासकीय पातळीवर चांगला बसला असून कार्यक्रमातही त्याचे प्रत्यय बघावयास मिळाले.
ेयेथील मयुर लॉन सभागृहात जिल्हास्तरीय सरपंच मेळावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बागडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी सभापती रचना गहाणे,पी.जी.कटरे,छाया दसरे,देवराज वडगाये,सीईओ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,सभापती हिरालाल फापनवाडे,लता दोनोडे,उपमुकाअ राजेश बागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.