पोलिसांसह बँकेचे अधिकारी शेतकèयांच्या दारी :जिल्हा बँकेकडून पठाणी वसुली

0
8

गोंदिया,berartimes.com दि.१८ : राज्य शासनाने शेतकèयांकडून केली जाणारी कर्जवसुली सक्तीने करू नये, असे आदेश दिले असले तरी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांचे पथक पोलिसांच्या ताफ्यासह वसुलीकरिता शेतकèयांच्या दारी जात आहेत. त्यामुळे शेतकèयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील ज्या शेतकèयांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले आहे. त्या सभासदांना महाराष्ट्र सहकार कायद्याच्या कलम १०७ नुसार नोटीस देण्यात आले. त्यानंतर देखील ज्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, अशांकडे बँकेचे पथक वसुलीकरिता जात आहे. पोलिसांना केवळ गावामध्ये वसुलीच्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ राहू नये, म्हणून सोबत ठेवण्यात येत असल्याचे संदीप जाधव जिल्हा उपनिबंधक तथा प्रशासक गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे म्हणणे आहे.
गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील तिर्थराज पारधी,तेजलाल पारधी,आनंदराव कटरे,भैय्यालाल बोपचे,चंद्रशेखर बोपचे यां शेतकèयांच्या घरी जाऊन वसुली द्या नाही तर जप्तीला तयार राहा असा दम अधिकाèयांनी दिल्याचे यांचे म्हणणे आहे.सोबतच बबई,बोटे, कुèहाडी, सालेकसा, देवरी तालुक्यात पोलिसांच्या ताफ्यासह बँकेचे अधिकारी, सेवा सहकारी संस्थेचे प्रतिनिधी शेतकèयांकडे घरी जाऊन कर्जवसुली करीत आहेत. पोलिसांसह अधिकाèयांचा ताफा बघून अनेक गावांतील शेतकरी धास्तावले आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी याकडे लक्ष घालून शेतकèयांना थोडा दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर पिकाची लागवड करण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून शेतकरी सातत्याने कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटामुळे अडचणीत सापडला. अशाही अवस्थेत गेल्या खरीप हंगामात शेतकèयांनी सावकारांकडून आणि बँकेकडून कर्ज घेऊन शेती कसली. निसर्गाच्या कृपेमुळे ७०टक्के उत्पन्न शेतकèयांच्या हातात पडले. दिवाळीपासून शेतकèयांनी धान कापणीला सुरवात केली. मळणी देखील तेव्हापासूनच सुरू झाली. मात्र, शासनाने आधारभूत धानकेंद्र उशिरा सुरू केले. परिणामी शेतकèयांनी व्यापाèयांकडे पडेल भावात धानाची विक्री केली. आधारभूत खरेदी केंद्रांवर दीड हजार रुपये qक्वटलप्रमाणे दर असताना खासगी व्यापारी तेच धान हजार ते अकराशे रुपयांदराने खरेदी करत होते. उपाय नसल्यामुळे शेतकèयांनी व्यापाèयांकडे धानाची विक्री केली. शेतकèयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. गोंदिया सारख्या धानपिकाच्या जिल्ह्यात देखील याच कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत चालली आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे शेतकèयांच्या हक्काची आणि हिताकरिता झटणारी बँक अशी समजूत आहे. या बँकेचा ७० टक्के व्यवहार शेतकèयांच्या भरवशावर चालतो. मात्र, याच बँकेकडून आता शेतकèयांकडे सक्तीची वसुली सुरू केल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्यात गेल्या काही वर्षापासून शेतकरी संकटात असल्यामुळे सक्तीची कर्जवसुली करण्यात येऊ नये, जप्ती आणण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही शाखांनी गावागावात जाऊन कर्जदार शेतकèयांकडून पठाणी वसुली सुरू केली आहे.

३९३ कोटींची थकबाकी
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१ शाखांच्या माध्यमातून ३९३ कोटी ७४ हजार ५८ हजार रुपयांचे कर्ज ८७ हजार २०२ शेतकèयांना वाटप केले. त्यापैकी २७९ कोटी २४ हजार ७२ कोटी रुपये शेतकरी सभासदांकडे थकीत आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३३ हजार ५१० शेतकèयांना ११४ कोटी ४९ लाख ८६ हजार रुपयांचे वाटप केले. त्याची वसुली बँकेने पोलिसांना सोबत घेऊन सुरू केली आहे.