भंडारा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने जांबुवंतराव धोटेंना श्रद्धांजली

0
15

भंडारा,दि.२२- विदर्भ राज्य आंदोलनाचे प्रणेते विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या निधनामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितिचे मोठे नुकसान झाल्याने ते भरुन निघणे कठीण असल्याची भावना व्यक्त करीत धोटे यांना भंडारा जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.विदर्भाचे राज्य होईपर्यंत मी मरणार नाही ही शपथ घेणारे भाऊ अचानक सोडून गेले यावर कुणाचाच विश्वास बसत नाही,विदर्भ राज्याची शपथ घेवून भाऊंचे स्वप्न सत्यात उतरवणे हीच भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी उपस्थितांनी शोकसवेंदना व्यक्त करतांना म्हटले. यावेळी कोर कमेटी सदस्य मधुकरजी कुकडे,अ‍ॅड आनंदराव वंजारी, जिल्हा अध्यक्ष वासुदेवराव नेवारे, युवक अध्यक्ष तुषार हटेवार, अर्जुन सुर्यवंशी, दामोदर क्षीरसागर, मयुर निंबार्ते, सारंग तिडके, भारत चौधरी, गोविंदराव चरडे, जाधवराव साठवणे, प्रकाश थानथराटे, प्रेमलाल लांजेवार, माधवराव फसाटे, किशोर चौधरी , प्रवीण भांडारकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, विजय दुबे, डॉ माधवराव मस्के,मंजुषा बुराडे,गायत्री पंचबुधे, अनिता बोरकर,रेणुका धकाते व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.