भाजप आमदारांच्या श्रीमतींना डावलत काँग्रेस आमदाराच्या श्रीमतींना मान

0
7

गोंदिया,दि.२२-गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्वदेशी खेळोतेज्जक मंडळाच्यावतीने आज (दि.२२)पासून सुरु झालेल्या जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आयोजक असलेल्या मंडळाच्या अध्यक्षांनी ज्यांनी कधीही सामाजिक कार्य केले नाही.आणि सामाजिक कार्याचा कुठलाच वसा दिसून येत नाही अशा काँग्रेस आमदारांच्या श्रीमतींना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.आयोजकांनी ज्याप्रमाणे काँग्रेसच्या आमदाराच्या श्रीमतीला स्थान दिले.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील भाजपच्या एकाही आमदाराच्यांच नव्हे तर पालकमंत्र्यांच्या श्रीमतींनाही स्थान दिले नसल्याचेही दिसून आले.उदघाटक म्हणून वर्षा पटेल यांचे नाव आहे.त्यांचे सामाजिक क्षेत्रात मनोहरभाई पटेल अकादमीच्या माध्यमातून काम दिसत आहे.त्या सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रात गोंदिया भंडारा जिल्ह्यात वावरतांना दिसतात.सामाजिक कार्यकत्र्या एॅड.सविता बेदरकर या तर बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी गावखेड्यात जाऊन समाजप्रबोधनाचे काम करतांना दिसतातच नव्हे तर त्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे पालन करीत अनेकांना त्यांचे हक्क सुध्दा मिळवून दिले आहे.याच कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रजनीताई नागपूरे याही आहेत.जेव्हा जिल्हा परिषदेचा कार्यक्रमच आहे तर या सास्कृतीक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्षांना ठेवून त्यांना मान द्यायला हवा होता.मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेकडे बघितल्यास निव्वळ काँग्रेसच्या नेत्यांनी राजकारण करण्यासाठीच हे जिल्हा क्रिडा समेलंना आपल्या मतदारसंघात आयोजित केले की काय अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.