अर्जुनी/मोरगाव महासमाधान शिबीर २७८४० लाभार्थ्यांना लाभ

0
17

अर्जुनी/मोरगाव,दि.२२ : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. मात्र अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ आजपर्यंत घेता आला नाही. महासमाधान शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या दारापर्यंत पोहचून योजनांचा लाभ देवून सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.२१ फेब्रुवारी रोजी अर्जुनी/मोरगाव तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात महाराजस्व अभियानाअंतर्गत महावितरण महासमाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती कासीम जामा कुरेशी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव कापगते, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक केवलराम पुस्तोडे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुमरे, श्री.पालीवाल, तेजुकला गहाणे, प्रभारी उपविभागीय अधिकारी विठ्ठल परळीकर यांची उपस्थिती होती.
महावितरण महासमाधान शिबिराचे औचित्य साधून तालुक्यातील २७८४० लाभार्थ्यांना ४४ योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना कागदपत्रे व वस्तू स्वरुपात लाभ देण्यात आला. यामध्ये नविन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव चढविणे/कमी करणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब आर्थिक लाभ योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, जमिनीचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रुपांतर, संपत्तीचे आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, विद्यर्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, जमिनीचे मोजणी पत्र, जमीन सुपिकता प्रमाणपत्र, कृषि पंपांना नविन वीज जोडणे, व्यावसायीक कनेक्शन, घरगुती नविन वीज जोडणे, रमाई घरकूल योजना, इंदिरा आवास योजना, मुद्रा बँक कर्ज, पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, आंतरजातीय विवाहन प्रोत्साहन योजना, वन्यप्राण्यांनी केलेली नुकसान भरपाई, महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी कर्ज वाटप, वनहक्क जमिनीचे पट्टे वाटप, मुलामुलींना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप, अपंगगत्व ओळखपत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, डिझेल पंप वाटप, उज्वला गॅस योजना, शेड नेट पॉलीहाऊस, बैलजोडी, पाईप, औजारे, धान उफणनी, पंखा, बैलगाडी, जनधन योजना, अपंगत्व प्रमाणपत्र, अपंग व्यक्तींना सहायक साधने व उपकरणे आणि गटई कामगारांना स्टॉलचे वाटप तसेच दिव्यांग स्वावलंबन योजनेअंतर्गत तपासणीअंती निवड झालेल्या १०६ व्यक्तींना उपकरणे व साधनांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील हजारोच्या संख्येने लाभार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार डी.सी.बोंबर्डे यांनी केले. संचालन प्रा.डी.यु.काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मानले.