पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाèयांची नेहरु भातगिरणीला भेट

0
8

गोेरेगाव,दि.२३- पंडित नेहरु सहकारी भात गिरणी गोरेगावला भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या नव्या धानमिलींग यंत्राची पाहणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश काळे,पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील,जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,जिल्हा कृषी अधिक्षक इंगळे,नेहरु धान गिरणीचे अद्यक्ष रेखलाल टेंभरे,तहसिलदार कल्याण डहाट,पोलिस निरिक्षक सुरेश कदम,डॉ.लक्ष्मण भगत आदी मान्यवर उपस्थित होते.नव्या स्वरुपातील ही धान मिल कुठेही नेऊन धानाचे मिqलग करता येऊ शकते अशी आहे.१ तासात ८-१० qक्वटल धानाची मिqलग करीत असून शेतकरी आपल्या शेतात नेऊन मिqलग सुध्दा करु शकतात अशी माहिती टेंभरे यांनी दिली.