एकच छत्रपती ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – अजिंक्य भांडारकर

0
11

लाखनी,berartimes.com दि.२३-जगाच्या इतिहासातील आदर्श मानणारे एकमेव राष्ट्रपुरुष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांनी त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे आदर्श विद्यार्थ्यानी घ्यायला हवी त्यांची चरित्राचे वाचन करावे. अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यानी अवांतर वाचन केले पाहिजे असे आपल्या प्रमुख भाषणात अजिंक्य भांडारकर बोलत होते.
स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ विद्यालय लाखनी येथे दास नवमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोझाताई कापगते, अजिंक्य भांडारकर व अध्यक्षस्थानी प्राचार्य दि ल माने, किशोर आळे उपस्थित होते. १६ व्या शतकात यादवांच्या पाडावानंतर डच पोर्तुगीच आणि मुगलांनी मराठी साहित्य आणि संस्कृती नष्ट करण्याचे कार्य केले. या अशा प्रतिकूल परिस्थितीतही समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रीय अस्मिता जागृत ठेवण्याचे कार्य केले. रामदास स्वामी यांनी लिहिलेले ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक व प्रेरक ठरत आहे, म्हणजे किती बहुमोल उंचीचे ग्रंथ सामुग्री त्यानी लिहिले या सर्व ग्रंथांचा विद्यार्थ्यानी अभ्यास करावा आणि आपल्या जीवनात आचरण करावा असे आपल्या प्रमुख भाषणात रोझाताई कापगते बोलत होत्या.दास नवमी निमित्त शाळेत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ग ५ ते ८ मधून कु श्रद्धा श्रावण गिरहेपुंजे, कु चेतना सुशिल गिरहेपुंजे, महिमा सहसराम इखार व वर्ग ९ ते १२ गटामधून हेमंत काशिनाथ मस्के, कु आकांक्षा हुसन कुंभारे, कु त्रिवेणी राजेश बड़गे या विजयी स्पर्धकांना यात बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अक्षय मासुरकर यांनी केले.