पांढरकवडा पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा

0
15

पांढरकवडा,दि.२३- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार पडलेल्या मतमोजनीनंतर शिवसेनेने पांढरकवडा पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने ८ पैकी ५ जागा जिंकत सेनेने आपला भगवा फडकवला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपा नेते अण्णासाहेब पारवेकर यांनी आमदार गटाशी विरोध असल्याकारणाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला.त्याचा लाभ शिवसेनेला होत शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळाले.अण्णासाहेब ज्यांच्या सोबत त्यांच्या पारड्यात विजय हे या भागातील बहुदा समिकरणच बनले आहे.अण्णासाहेबांशी जुळवून न घेणे भाजपाला चांगलेच महागात पडले आहे.पंचायत समितीची केवळ एक जागा भाजपला मिळविता आली.जि.प. मध्ये काँग्रेसला तर पं.सं. मध्ये सेनेच्या उमेदवारांच्या पदरात विजयश्री टाकली. शिवसेनेचे गजानन बेजंकीवार हे पाटणबोरी जि.प. सर्कलमधून विजयी झाले आहेत.जि.प. ची एक जागा काँग्रेसने बळकावली आहे.पहपाळ जि.प. सर्कल मधून काँग्रेसच्या सौ सुचरिता अमर पाटील या १५२५ मतांनी विजयी झाल्या.जिल्हा परिषद गट खैरगांव सर्कल – कविता विष्णु राठोड (काँग्रेस) ६७२३ मते ९१३ मतांनी विजयी. पहापळ जिल्हा परिषद सर्कल – सुरचिता पाटील काँग्रेस ६५११ मते १५२५ मतांनी विजयी, पाटणबोरी जि.प. सर्कल – गजानन बेजंकीवार (शिवसेना) ६३२७ मते ४७१ मतांनी विजयी. मोहदा करंजी जि.प. सर्कल – पिंटू मानकर (राष्ट्रवादी) ५१७२ मते १८६३ मतांनी विजयी. रूंझा पं.स. सर्कल – पंकज तोडसाम (शिवसेना) १९३६ मते १२६ मतांनी विजयी, करंजी पं.स. सर्कल नंदुरकर (राष्ट्रवादी) ३००४ मंते ४१५ मतांनी विजयी, खैरगांव बु. पं.स. सर्कल बोंडे काँग्रेस ३६८५ मते ९०८ मतांनी विजयी. सायखेडा पं.स. सर्कल गेडाम भाजपा ३२८७ मते ४२१ मतांनी विजयी, पहापळ पं.सं. सर्कल अनुराधा वेट्टी शिवसेना २७३५ मते ७१ मतांनी विजयी, आकोली बु. पं.स. सर्कल संतोष बोडेवार शिवसेना २८२२ मते ५ मतांनी विजयी येथे भाजपाचा ४ मतांनी निसटता पराभव झाला. बोथ पं.स. सर्कल सौ इंदुबाई मिसेवार (शिवसेना) २६८७ मते ९७ मतांनी विजयी तर पाटणबोरी पं.स. सर्कल राजु पसलावार (शिवसेना) २८०३ मते १९५ मतांनी विजयी झाले.