उपजिलाधिकाèयांची तीन, नायब तहसीलदारांची १२ पदे रिक्त

0
8

गोंदिया,दि.२७ : अपुरा अधिकारी कर्मचारी वर्ग आणि त्यात आर्थिक वर्ष संपण्याआधी शासनाने दिलेले महसूल उदिष्ठ गाठण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पटवाèयांच्या रिक्त पदांमुळे महसूल वसुलीवर परिणाम झाला आहे. अ, ब आणि क वर्ग श्रेणीतील ५१७ पदांपैकी ७६ पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील उपअभियंता (जलसंधारण) रोहयो १, नायब तहसीलदार (ब श्रेणी) १२, कनिष्ठ अभियंता रोहयो १, सहायक लेखाधिकारी १, मंडळ अधिकारी ३, पटवारी १७ आणि कोतवालांची ३८ पदे रिक्त आहेत. यासोबतच उपजिल्हाधिकारी (सामान्य), उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तसेच अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी पद रिक्त पडले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (निवडणूक) हे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे. १६ एप्रिल २०१५ ला उपजिलाधिकारी लोणकर यांना या पदावरून कार्यमुक्त केले होते. उपजिल्हाधिकारी (सामान्य) हे पद गेल्या १२ महिन्यांपासून रिक्त आहे. उमेश काळे यांची बदली १८ फेब्रुवारी २०१६ ला झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. ब श्रेणीतील नायब तहसीलदारांचे १२ पद रिक्त आहे. सहायक अधीक्षक (दंड) आणि नायब तहसीलदार रोहयो यांची पदे रिक्त आहेत.नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदारांचेही पद रिक्त आहे. नायब तहसीलदार एस.वाय.रामटेके हे ३१ मार्च २०१६ ला कार्यमुक्त झाल्यानंतर हे पद भरण्यात आले नाही. अर्जुनी मोरगावमध्ये नायब तहसीलदार १, देवरीत ४, आमगावात १, सालेकसात १ पद रिक्त आहे.